Goa Beach Shacks Dainik Gomantak
गोवा

Goa Beach Shacks: किनारपट्टी भागातील तीस टक्के शॅक्स दिल्लीवाल्यांकडे- खंवटे

बेकायदा गोष्टी खपवून घेणार नाही

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Beach Shacks किनारपट्टी भागातील शॅक्सपैकी 30 टक्के शॅक्स हे थेट दिल्लीवाल्यांना चालवण्यास दिले जातात. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गोष्टी केल्या जातात, असा गंभीर आरोप पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी आज, शुक्रवारी केला.

अशा बेकायदा बाबींना आळा घालण्यासाठी पर्यटन खाते प्रयत्नशील आहे. म्हणूनच काही शॅकधारकांकडून नव्या शॅक धोरणाला स्वार्थापोटी विरोध केला जात आहे, असेही ते म्हणाले.

पर्यटनमंत्री खंवटे आणि कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दोन दिवसांपूर्वी शॅकमालक असोसिएशनचे अध्यक्ष जॉन लोबो यांनी पर्यटन खात्यातील काही कर्मचारी शॅकधारकांकडून खंडणी वसूल करतात, असा आरोप करत नव्या शॅक धोरणाला, पर्यायाने ‘मॉडेल शॅक’ला विरोध केला होता.

यावर आज मंत्री खंवटे यांनी जोरदार टीका करत जॉन लोबो यांच्याविरोधात पर्यटन खात्याच्या संचालकांना भ्रष्टाचारविरोधी विभागाकडे तक्रार करण्यास बजावले आहे, असे सांगितले.

किनारपट्टी भागातील शॅक्सपैकी 30 टक्के शॅक्स हे थेट दिल्लीवाल्यांना चालवण्यास दिले जातात. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गोष्टी केल्या जातात, असा गंभीर आरोप पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी आज, शुक्रवारी केला.

अशा बेकायदा बाबींना आळा घालण्यासाठी पर्यटन खाते प्रयत्नशील आहे. म्हणूनच काही शॅकधारकांकडून नव्या शॅक धोरणाला स्वार्थापोटी विरोध केला जात आहे, असेही ते म्हणाले.

पर्यटनमंत्री खंवटे आणि कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दोन दिवसांपूर्वी शॅकमालक असोसिएशनचे अध्यक्ष जॉन लोबो यांनी पर्यटन खात्यातील काही कर्मचारी शॅकधारकांकडून खंडणी वसूल करतात, असा आरोप करत नव्या शॅक धोरणाला, पर्यायाने ‘मॉडेल शॅक’ला विरोध केला होता.

यावर आज मंत्री खंवटे यांनी जोरदार टीका करत जॉन लोबो यांच्याविरोधात पर्यटन खात्याच्या संचालकांना भ्रष्टाचारविरोधी विभागाकडे तक्रार करण्यास बजावले आहे, असे सांगितले.

भोंगा एकीकडे, बटण दुसरीकडे

शॅकवाल्यांचा विषय जाणीवपूर्वक कोणीतरी हाताळत असल्याचा आरोप करून खंवटे यांनी अप्रत्यक्षरित्या मायकल लोबोंवर शरसंधान साधले. ‘भोंगा एकीकडे आणि त्याचे बटण दुसरीकडे’ असल्याचे सांगत या विषयाचे रिमोट दुसऱ्याच्या हातात असल्याची टीका केली.

आरोपामागे राजकीय नेते

पर्यटन खात्यावर खंडणीचे बेछूट आरोप करण्यामागे काही राजकीय नेते सक्रिय असून तेच आपल्या समर्थकांना असे आरोप करण्यास सांगतात. अनेक शॅकधारकांकडून कायद्याचे आणि नियमांचे उघडपणे उल्लंघन केले जाते, असे मंत्री खंवटे म्हणाले.

सरकारला जाब विचारणार : गोवा फॉरवर्ड

शॅकप्रश्‍नी गोवा फॉरवर्डचे विकास भगत म्हणाले की, गोमंतकीयांच्या हिताविरोधात सरकारने निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्याविरुद्ध आगामी विधानसभेत आमदार विजय सरदेसाई सरकारला जाब विचारणार आहेत.

खाण व पर्यटन व्यवसाय हा राज्याचा आर्थिक कणा आहे. मात्र, हे व्यवसाय परप्रांतीयांकडे देण्याचे षडयंत्र सरकार रचत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT