Landslide In Goa Dainik Gomantak
गोवा

Landslide In Goa: दरड कोसळून तीन दुचाकी गाडल्या गेल्या; कुठ्ठाळी जंक्शनजवळील घटना

Cortalim Junction: अग्निशमन दलाने युद्धपातळीवर काम करून तिन्ही दुचाकी बाहेर काढल्या

गोमन्तक डिजिटल टीम

कुठ्ठाळी जंक्शनशेजारी गुरुवारी मोठे दरड कोसळून तीन दुचाकी गाडल्या गेल्या. अग्निशमन दलाने युद्धपातळीवर काम करून तिन्ही दुचाकी बाहेर काढल्या. यावेळी कुठ्ठाळीचे आमदार आतोन वाझ हेही उपस्थित होते.

राज्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले असून राष्ट्रीय महामार्गाजवळील दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. कुठ्ठाळी येथे मुख्य वळणावर राष्ट्रीय महामार्ग ६६ जवळील डोंगरावरील दरड कोसळून कुठ्ठाळी फेरीबोट ते मुख्य वळणावरील रस्ता वाहतुकीस बंद झाला.

डोंगराळ भागातील माती कोसळून खाली रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या तीन दुचाकींवर पडल्याने त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या. याची माहिती स्थानिक आमदार आंतोन वाझ यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना मदत केली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती मुरगाव आपत्कालीन व्यवस्थापन समितीने दिली आहे.

गुरुवारी सकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे सांकवाळ-सावळफोंड येथे पूरग्रस्त स्थिती निर्माण झाल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचेही हाल झाले.

तोपर्यंत रस्ता बंद ठेवा!

खबरदारीचा उपाय म्हणून फेरी पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर जेथे दरड कोसळली तो रस्ता पावसाळा संपेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्देश यावेळी आमदार वाझ यांनी दिला. तसेच भूस्खलन प्रवण भागात संरक्षक भिंत बांधण्यासाठी सरकारकडे विनंती करणार असून या मुख्य रस्त्याच्या कडेला दुचाकी तसेच इतर वाहने पार्क न करण्याचे आवाहन आमदारांनी यावेळी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

SCROLL FOR NEXT