Subhash Phaldesai  Dainik Gomantak
गोवा

Sanguem IIT: सांगेत 'आयआयटी'साठी नव्याने 3 जागा सुचविल्या; केंद्रीय समिती करणार पाहणी

समाजकल्याण मंत्री, सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांची माहिती

Akshay Nirmale

Sanguem IIT: गोव्यातील सांगे तालुक्यात प्रस्तावित असलेल्या आयआयटीसाठी तीन जागांचा विचार केला जात आहे. आयआयटीच्या कायमस्वरूपी कॅम्पससाठी गोवा सरकारने सांगेतील शेतकऱ्यांच्या विरोधानंतर सांगेतच तीन नव्या जागा शोधल्या आहेत.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला या नवीन जागांबाबत आधीच राज्य सरकारने लेखी कळवले आहे. या तिन्ही भुखंडाची स्थळ निवड समितीकडून पाहणी आणि निरीक्षण याबाबत या सुचनेवर 15 दिवसांत प्रतिसाद अपेक्षित आहे, अशी माहिती समाजकल्याण खात्‍याचे मंत्री तथा सांगे मतदारसंघाचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिली आहे.

गोव्यातील इतर ठिकाणी स्थानिकांच्या विरोधामुळे हा प्रकल्प तिथे होऊ शकलेला नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि फळदेसाई यांना हा प्रकल्प सांगेतच हवा आहे. गतवेळी केंद्रीय मंत्रालयाने जमीन अपुरी असल्याचे सांगत स्थळ निवड समितीला पाहणी करण्यासाठी भेट देणे योग्य नाही, असे सांगितले होते.

“सांगे येथे आयआयटीमुळे या भागाच्या विकासाला चालना मिळेल. पूर्वीची जागा देखील या नव्या तीन सूचनांचा भाग आहे. ही जागा अपुरी आढळून आली कारण 7 लाख चौरस मीटर जमिनीपैकी 4 लाख चौरस मीटर हा डोंगराळ भाग होता.

आता आम्ही या जागेवर प्रकल्प व्यवहार्य करण्यासाठी लगतची अतिरिक्त जमीन विचारात घेतली आहे, असेही फळदेसाई यांनी सांगितले.

सांगे येथील पूर्वीची जागा सरकारने शॉर्टलिस्ट केली होती कारण जमीन आधीच राज्याच्या ताब्यात होती आणि खाजगी जमीन मालकांनी शेवटच्या क्षणी नकार दिला तरी फरक पडणार नव्हता. सूत्रांच्या माहितीनुसार नव्या जागांमध्ये मात्र खासगी जमीनींचाही समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT