3 lakh cannabis seized in Hanjun; Japanese citizen arrested Dainik Gomantak
गोवा

हणजूणमध्ये 3 लाखांचे ड्रग्ज जप्त; जपानी नागरिकास अटक

संशयित हिनाघटा येशुजी ड्रग्ज व्यवसायात गुंतल्याची माहिती खबरींकडून मिळाली

दैनिक गोमन्तक

शिवोली: झोरवाडा-हणजूण येथील ला वियोला विला परिसरात बुधवारी मध्यरात्री हणजूण पोलिसांनी सापळा रचून घातलेल्या धाडीत तीन लाख वीस हजार रुपयांचा ड्रग्ज जप्त केला. या कारवाईत ड्रग्ज व्यवहारासाठी आलेल्या संशयित हिनाघटा येशुजी (59, रा.झोरवाडा-हणजूण) या जपानी नागरिकास पोलिसांनी अटक केली. हणजूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित हिनाघटा येशुजी ड्रग्ज व्यवसायात गुंतल्याची माहिती खबरींकडून मिळाली होती.

त्यानुसार बुधवारी मध्यरात्री सापळा रचून संशयित येशुजीची झडती घेतली असता त्याच्याकडे 133 ग्रॅम गांजा आढळला. त्याची बाजारात किंमत अंदाजे वीस हजार असून एक किलो चरस आढळला. चरसची बाजारात किंमत अंदाजे तीन लाख होते. दरम्यान, संशयित येशुजी यांचे रद्दबातल ठरलेले पारपत्र पोलिसांनी जप्त केले असून अवैध वास्तव्य तसेच अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताची रवानगी सध्या हणजूणच्या पोलिस कोठडीत करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत देसाई यांनी दिली. हणजूण पोलिस स्थांकाच्या उपनिरीक्षक स्नेहा सावळ, निरीक्षक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: काँग्रेसची 22 सप्टेंबरपासून गोवा राखण यात्रा; युरी आलेमाव यांची घोषणा, पेडण्यापासून काणकोणपर्यंत आयोजन

Chhattisgarh Woman Assault: आधी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, मग हात पाय बांधून जबरदस्तीनं मुंडण, अन्...; चार मुलांसमोर नराधम बापाची आईवर क्रूरता

New York Times Square Firing: न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये पुन्हा गोळीबार; NBA चॅम्पियनशिपच्या जल्लोषादरम्यान गोंधळ, संशयित ताब्यात VIDEO

Shreyanka Patil Ruled Out: टीम इंडियाला मोठा धक्का! दुखापतीमुळे श्रेयंका पाटील टी-20 विश्वचषकातून बाहेर, कोणाची होणार एन्ट्री?

Sattari water Isuue: दूषित पाणीप्रकरणी आयोग सक्रिय; सत्तरीत स्वतःहून चौकशी, संबंधित विभागांना नोटीस

SCROLL FOR NEXT