Goa Police Corruption Dainik Gomantak
गोवा

Colva Police: भंगारवाल्याकडून घेतली लाच, बेड्या ठोकण्याची दिली धमकी; कोलवा स्थानकाचे 3 पोलिस निलंबित

Colva Police Suspension: कोकण रेल्वे पोलिसांचे लाचखोरी प्रकरण ताजे असतानाच आता कोलवा पोलिस ठाण्यातील तीन पोलिस शिपायांचा असाच ‘भीमपराक्रम’ उघड झाला आहे.

Sameer Panditrao

मडगाव: कोकण रेल्वे पोलिसांचे लाचखोरी प्रकरण ताजे असतानाच आता कोलवा पोलिस ठाण्यातील तीन पोलिस शिपायांचा असाच ‘भीमपराक्रम’ उघड झाला आहे. एका भंगारवाल्‍याकडून लाच घेतल्‍याप्रकरणी त्‍यांना सेवेतून त्वरित निलंबित करण्‍यात आले आहे. अमर गावकर, सिद्देश शिरोडकर व सत्यम देसाई अशी या तिघांची नावे आहेत.

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी या लाचप्रकरणाची गंभीर दखल घेत अमर गावकर, सिद्देश शिरोडकर आणि सत्यम देसाई यांना सेवेतून निलंबित करण्‍याचा आदेश जारी केला. एका भंगारवाल्याचा माल पकडून, त्‍याला धमकावून त्‍याच्‍याकडून लाच घेतल्याचे हे प्रकरण आहे. 

हे सर्वजण कोलवा पोलिस ठाण्यात कार्यरत होते. दरम्‍यान, तूर्त तपास सुरू असल्याने पोलिसांनी अधिक माहिती देणे टाळले. या प्रकरणाच्‍या तपास कामात पोलिसांनी गुप्तता बाळगली होती.

या त्रिकुटाने  एका भंगारवाल्याची रिक्षा पकडली होती. त्‍यात भंगार होते. ‘आम्ही तुला अडचणीत आणू व बेड्याही ठोकू’ असे या पोलिसांनी सांगून त्याच्याकडे मांडवली केली होती. नंतर सर्व मामला आटोपला होता.  दरम्‍यान, याच भंगारवाल्याला अन्य एका प्रकरणात मायणा-कुडतरी पोलिसांनी पकडले होते. त्‍यावेळी त्याने वरील बाबही सांगून टाकली. त्यानंतर चौकशी सुरू झाली असता, त्यात तथ्य आढळले. नंतर पोलिसांनी  संपूर्ण तपास करून त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून दिला होता. आता या पोलिसांवर निलंबनाची वेळ ओढवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT