3 attackers in Jharkhand arrested by Konkan Railway Police

 
Dainik Gomantak
गोवा

ब्लेडने वार करणारे 3 हल्लेखोर कोकण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: एका कंत्राटदाराल जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आणि त्याच्या तीन कामगारावर ब्लेडने वार करून जखमी केल्या प्रकरणी तीन हल्लेखोरांना कोकण रेल्वे पोलिसांनी (Konkan Railway Police) अटक केली. हे आरोपी फरार होण्याच्या तयारीत असताना कोकण रेल्वे पोलिसांनी रत्नागिरी येथे त्यांना अटक केली.

अधिक माहितीनुसार विशवनाथ नावाच्या कंत्राटदाराला पैशाच्या व्यव्हारमधून झालेल्या बाचाबाचीत जीवे मारण्याची धमकी दिली होती. या दरम्यान या कंत्राटदाराचे तीन कामगार मध्ये पडले असता या तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर ब्लेडने वर केले. यात एकाच गळा चिरला व त्यामुळे या कामगाराला रक्तस्त्राव होऊ लागला. यावेळी हे हल्लेखोर घटनास्थळाहून पसार झाले.

याची माहिती पोलिसांना मिळताच बिनतारी यंत्रणेमार्फत संदेश इतर ठिकाणी देण्यात आला. रत्नागिरी येथे सावध असलेल्या पोलिसांनी सापळा रचून या तिन्ही हल्लेखोरांना पाळण्याच्या तयारीत असताना शिफातीने अटक केली. हे हल्लेखोर झारखंड या राज्यातील असून ते आपल्या मूळ गावी जाण्याच्या तयारीत होते. त्यांची नावे मिथुन, तिमन आणि अनिल अशी आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT