Hill Cutting in Goa  Dainik Gomantak
गोवा

Hill Cutting: डोंगर कापणी, जमीन बुजवणेसंदर्भात ५० जणांवर कारवाई! भरारी पथकाची कामगिरी

Illegal Hill Cutting: सर्वाधिक सासष्टी तालुक्यात २० जणांवर कारवाई; याशिवाय ३५ अज्ञातांविरोधात तक्रारी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Hill Cutting

मडगाव: दक्षिण गोव्यात १ जानेवारी ते १५ ऑगस्ट या कालावधीत २९ डोंगर कापणी आणि २१ मातीचा भराव घालून जमीन बुजवण्याचे प्रकार मिळून ५० जणांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. याप्रकरणी दक्षिण गोवा भरारी पथकाने पाहणी करून संबंधितांना काम बंद आणि कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यात सर्वाधिक सासष्टी तालुक्यात २० जणांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय ३५ अज्ञातांविरोधात तक्रारी आल्या आहेत.

राज्य सरकारने राज्यात कुठेही डोंगरकापणी सुरू असली तरी त्याबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्याची जबाबदारी तलाठ्यांवर सोपवली आहे. राज्य आपत्कालीन यंत्रणेच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वतःच तशी घोषणा केली होती.

दरम्यान, १ जानेवारी ते १५ ऑगस्ट या कालावधीत दक्षिण गोव्यात २९ डोंगर कापणी आणि २१ मातीचा भराव टाकून जमीन बुजवण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी उपजिल्हाधिकारी व्हेल्टन टेलीस यांनी आदेश जारी करून संबंधितांना नोटीस बजावली आहे. याच कालावधीत ३५ प्रकारांत उल्लंघन करणाऱ्यांची माहिती मिळाली नाही. वरील कालावधीत सासष्टी तालुक्यात सर्वाधिक २० जणांवर कारवाई केली आहे. त्यानंतर केपे ११, फोंडा ७, काणकोण ४, तर धारबांदोडा आणि मुरगाव तालुक्यात प्रत्येकी ३ आणि सांगे तालुक्यात दोघांवर कारवाई केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT