Dharbandoda Accident Dainik Gomantak
गोवा

Dharbandoda Accident: वाढदिवसाची पार्टी करुन परतणाऱ्या तरुणाला वाहनानं उडवलं, 2 महिन्यांच्या चिमुरड्याचं छत्र हरपले

Goa Road Accidents: भूमिकानगर-तिस्क येथील २८ वर्षीय युवकाने हल्लीच दुचाकी विकत घेतली होती. याच दुचाकीवरून वाढदिवसाची पार्टी करून सकाळी घरी परतताना असताना अपघातात मृत्यू झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

Dharbandoda Accident

फोंडा: भूमिकानगर-तिस्क येथील २८ वर्षीय युवकाने हल्लीच दुचाकी विकत घेतली होती. याच दुचाकीवरून वाढदिवसाची पार्टी करून सकाळी घरी परतताना झालेल्या अपघातात त्याचा दुर्दैवी अंत झाला, तर त्या दुचाकीवर मागे बसलेला युवक जखमी झाला.

धारबांदोडा संजीवनी कारखान्यासमोरील राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी (ता. १६) पहाटे ४ ते ५ च्यादरम्यान अज्ञात वाहनाची धडक बसून भूमिकानगर-तिस्क उसगाव येथील दुचाकीचालक महंमद रफी हुसेन बाशा मोमीन (वय २८ वर्षे, मूळ कर्नाटक) याचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेला रोहित निकोलस कुजर (वय २० वर्षे, सध्या रा. भूमिकानगर, मूळ झारखंड) या जखमी युवकावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. दुचाकीला धडक देऊन पसार झालेल्या अज्ञात वाहनचालकाचा फोंडा (Ponda) पोलिस शोध घेत आहेत.

बुधवारी रात्री मित्राच्या वाढदिवसानिमित्त आयोजिलेल्या पार्टीला हजर राहण्यासाठी महंमद आणि रोहित हे दोघेही जीए-०३-एबी-७०५१ या क्रमांकाची दुचाकी घेऊन मोले येथे गेले होते. सकाळी परतताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाची धडक बसून हा अपघात (Accident) झाला. यात महंमदचा जागीच मृत्यू झाला. महंमद हा उसगावातील नेस्ले कंपनीत कंत्राट पद्धतीवर काम करीत होता. बुधवारी रात्री तो मित्राच्या वाढदिवसाला गेला होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन महिन्यांचा मुलगा आहे.

दुचाकीची धडक : कामगार जखमी

खुरसाकडे-उसगाव येथे रस्त्यावर हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम करताना दुचाकीची धडक बसल्याने मारुती अशोक नेर्लेकर हा कामगार जखमी झाला. या अपघातात दुचाकीस्वारही जखमी झाला. जखमींना अधिक उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT