Accident News Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: आईच्या डोळ्यांची तपासणी उरकल्यानंतर कामावर निघालेल्या तरुणावर काळाचा घाला, बस धडकेत मृत्यू

Goa Fatal Accident: वडिलांचे एका वर्षांपूर्वी निधन झाले होते. दोन भाऊ व एक बहीण असा परिवार आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव : आपल्या आईला डोळ्यांच्या डॉक्टरकडे तपासणीसाठी नेऊन नंतर वेर्णा येथे कामाला जात असताना बसने धडक दिल्याने एका जोसेफ फेरेरा (२७) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तो बोर्डा येथील रहिवासी आहे.

सोमवारी ७.३० वा.च्या सकाळी दरम्यान मडगावच्या आबाद फारिया मार्गावर हा अपघात घडला. जोसेफ हा वेर्णा येथे औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत कामाला होता. त्याच्या वडिलांचे एका वर्षांपूर्वी निधन झाले होते. दोन भाऊ व एक बहीण असा परिवार आहे.

आईला डोळ्यांच्या डॉक्टरकडे तपासणीसाठी नेऊन तिला तेथे ठेवून तो दुचाकीवरून कामाच्या ठिकाणी जात असताना ओव्हरटेक करणाऱ्या एका बसने त्याला ठोकर दिली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याने डोक्यावर हेल्मेटही घातले होते. जखमी स्थितीत त्याला सुरवातीला दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेले.

मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने नंतर त्याला गोमेकॉत हलविले असता, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मडगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT