Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update : राज्यात आज, उद्या ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाची माहिती

मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे; हवामान खात्याचे आवाहन

गोमन्तक डिजिटल टीम

Orange alert in Goa : मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांत पूरजन्यस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने राज्यात 27 व 28 जुलैला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तर 29 व 30 जुलै रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे बुधवारपासून झाडे कोसळणे, पाण्याखाली रस्ते जाणे तसेच पडझडीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी सायंकाळी कॅसलरॉक येथे कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतूक सेवा ठप्प झाली असून दरड हटवण्याचे काम सुरू असल्याने काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

राज्यात 27 व 28 जुलैला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तर 29 व 30 जुलै रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

गेल्या चोवीस तासांत म्हापसा 90, पेडणे 70.8, पणजी 75.0, फोंडा 101.01, ओल्ड गोवा 86.7, साखळी 78.6, वाळपई 112.7, काणकोण 91.8, दाबोळी 77.2, मुरगाव 70.3, केपे 90.2 आणि सांगे 112.4 मीमी पावासाची नोंद झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT