Eco Sensitive Zone In Sanguem Dainik Gomantak
गोवा

Eco Sensitive Zone: इको सेन्सिटीव्ह झोनमुळे सांगेत भीतीचे वातावरण; खाण, चिरे, रेती उत्खननावर येणार निर्बंध

Eco Sensitive Zone In Sanguem: सांगे तालुक्यातील 26 गावांचा इको सेन्सिटीव्ह झोनमध्ये समावेश झाला आहे. परिणामी या भागात खाण, रेती उपसा तसेच चिरे खाणींवर कायमचे निर्बंध येतील.

Manish Jadhav

सांगे तालुक्यातील 26 गावांचा इको सेन्सिटीव्ह झोनमध्ये समावेश झाला आहे. परिणामी या भागात खाण, रेती उपसा तसेच चिरे खाणींवर कायमचे निर्बंध येतील, अशी लोकभावना पसरली आहे. मुळात नेत्रावळी अभयारण्य म्हणून घोषित झाल्यामुळे सांगे तालुक्यातील अभयारण्यातील तसेच जैव संवेदनशील क्षेत्रामधील खाण व्यवसाय 2003 पासून बंद आहे.

मसुदा अधिसूचनेत सांगे तालुक्यातील 26 गावांचा समावेश आहे. यामध्ये काले, डोंगुर्ली, दुधाळ, मावळींगे, ओडशेल, भोमा, भाटी, कुंभारी, डोंगर, नायकीनी, पाटे, पोत्रे, तुडव, उगे, विलीयण, शिगोणे, कुर्डी, पोट्टेम, नेतुर्ली, रुमडे, वेर्ले, विचुंद्रे, नुने, रिवण, कोळंब, साळावली या गावांचा पश्चिम घाटासाठी संवेदनशील क्षेत्रात समावेश आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने पश्चिम घाटासाठी संवेदनशील क्षेत्र संदर्भात अंतिम अधिसूचना जारी केली असून सांगे तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायतीनी अधिसूचनेत अधोरेखित गावे संवेदनशील क्षेत्रात घालण्यास विरोध दर्शवला आहे. इथल्या ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेतल्या नाहीत. मात्र, विरोधाची पत्रे संबंधित यंत्रणेला सादर केली आहेत.

तांबड्या श्रेणीतील उद्योगांना थारा नाही

दुसरीकडे, या भागामध्ये खाण, चिरे खाण आणि रेती उत्खनन व्यवसायावर कायमची बंदी येणार आहे. चालू खाण व्यवसाय पाच वर्षात बंद केला जाणार आहे. तांबड्या श्रेणीतील उद्योगांना थारा नाही. मोठ्या इमारती, बांधकाम, नवीन विस्तारित प्रकल्प, अधिक क्षेत्रफळ असलेल्या टाऊनशिप आणि क्षेत्र विकास प्रकल्प विकसित करण्यास प्रतिबंध असून केवळ प्रचलित कायदे आणि नियमानुसार पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये अस्तिवात असलेले घरांची दुरुस्ती किंवा विस्तार नूतनीकरण यावर कोणतेही निर्बंध नाहीत. अधिसूचनेनुसार भगव्या आणि पांढऱ्या श्रेणीतील व्यवसायांना पर्यावरणाची काळजी घेऊन सुरु करण्यास मुभा आहे.

मंत्री सिक्वेरांसमवेत होणार सरपंचांची बैठक

पश्चिम घाटासाठी (Western Ghats) संवेदनशील क्षेत्र समितीने ऑक्टोबर 2023 मध्ये भेट दिली असता समितीसमोर आपले म्हणणे मांडले होते. लोकांची कामे सरकारी अधिकाऱ्यांच्या लालफितीत अडकून राहतील. या ना त्या कारणामुळे लोकांची अडवणूक होईल, अशी भीती लोकांना वाटते. त्यामुळे लोकांचे सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे. समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी पुढाकार घेऊन सांगेतील (Sanguem) पंचायतींच्या सरपंचांची एक बैठक पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्यासोबत घेऊन याबाबत आपली मते मांडण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vhalshi Lake: व्हाळशी तळ्याची संरक्षक भिंत खचली, भिंतीला तडे; दुर्घटना टाळण्यासाठी तातडीनं दुरुस्तीची मागणी

Success Story: अपुरे नेटवर्क, आर्थिक अडचणी... तरीही मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर वैभवीची 'IIT'पर्यंत मजल! राज्‍यातील एसटी समाजातील पहिली पदवीधर

Gajkesari Rajyog 2026: गुरु-चंद्र युतीचा चमत्कार! 4 ऑक्टोबरपासून 'या' 4 राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; गजकेसरी राजयोग ठरणार वरदान

Shocking Viral Video! चालत्या ट्रेनमध्येच प्रवाशानं केली लघवी; संतापलेल्या सहप्रवाशांनी घेरलं, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

Junta House Demolition: पणजीतील 'जुन्ता हाउस'च्या पाडकामाला लवकरच सुरुवात, चोहोबाजूंनी पडद्याचे संरक्षण; इमारतीतील साहित्य हटवले

SCROLL FOR NEXT