water pipeline damaged near Xavier's College  Dainik Gomantak
गोवा

Pipeline Burst : राज्यात जलवाहिन्या फुटण्याचे सत्र सुरूच; दत्तवाडी-म्हापसा येथे हजारो लीटर पाण्याची नासाडी

कंत्राटदाराची मनमानी भोवली

दैनिक गोमन्तक डिजिटल

Pipeline Burst : राज्यात ठिकठिकाणी खोदकामावेळी जलवाहिन्या फुटण्याचे सत्र सुरूच असल्याने भर उन्हाळ्यात पाण्याअभावी लोकांची तारांबळ उडत आहेत. बुधवारी उसगाव-गांजे आणि डिचोलीत गुरुवारी जलवाहिनी फुटली होती.

शुक्रवारी भूमिगत वीजवाहिन्यांचे काम सुरू असताना दत्तवाडी, म्हापसा येथे उद्यानानजीक 250 एमएमची जलवाहिनी फुटली. त्यामुळे हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली. परिणामी दत्तवाडी, मरड, मार्केट परिसर, फेर-आल्त भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला.

उपलब्ध माहितीनुसार, शुक्रवारी (ता.7) दुपारी दत्तवाडी येथे भूमिगत केबल टाकण्याचे काम करणाऱ्या विद्युत विभागाच्या कंत्राटदाराने 250 एमएम जलवाहिनी फोडली. यामुळे हजारो लीटर पाणी वाया गेले.

या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक आशीर्वाद खोर्जुवेकर यांनी संबंधित कंत्राटदार तसेच साबांखाच्या पाणी विभागातील अभियंत्यांशी संपर्क साधून दुरुस्तीसाठी पुढाकार घेतला. या भागातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आणि कंत्राटदाराने जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. रात्री उशिरापर्यंत किंवा शनिवारी सकाळपर्यंत हे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.

कंत्राटदाराचा मनमानीपणा भोवला

साबांखाच्या सूत्रांनी सांगितले की, खात्याच्या अधिकाऱ्यांनी या कंत्राटदाराला गुड फ्रायडे आणि इस्टरपर्यंत हे काम करू नको, असे सांगितले होते. तरीही त्याने हे काम हाती घेतले.

त्याचवेळी ही जलवाहिनी फुटली आणि लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. आता या कंत्राटदारावर साबांखा काय कारवाई करणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ganesh Immersion: गणेश विसर्जनासाठी गोव्यात 47 ठिकाणी जीवरक्षक तैनात! 35 समुद्रकिनारे आणि 12 अंतर्गत विसर्जनस्थळी विशेष सुरक्षा व्यवस्था

Indian Ship Attack: अरबी समुद्रात भारतीय जहाजावर भीषण हल्ला! 13 भारतीयांची सुटका, 1 बेपत्ता; परराष्ट्र मंत्रालय आक्रमक

Two Wheeler Ban Porvorim: पर्वरी उड्डाणपुलावर दुचाकींना 'नो एंट्री'! अपघातानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये; 65 किमी वेगमर्यादा, रडार आणि सीसीटीव्हीचीही तयारी

Goa Crime: 5 लाखांची सुपारी, कॅसिनो संचालकावर गोळीबार! मुख्य शूटर उत्तर प्रदेशातून जेरबंद; नेपाळला पळून जाण्याच्या होता तयारीत

Harmanpreet Kaur Record: हरमनप्रीत कौरने रचला इतिहास! मिताली राजचा रेकॉर्ड मोडीत काढत बनली आशियातील यशस्वी कॅप्टन; भारताने 8व्यांदा जिंकली 'आशिया कप ट्रॉफी'

SCROLL FOR NEXT