Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: नोकरी मिळत नसल्याने 24 वर्षीय तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; सासष्टी येथील धक्कादायक प्रकार!

24 Year Old Woman Dies by ends life in Goa: सासष्टी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणीने नोकरी नसल्याने गळफास घेवून आपले जीवन संपवले.

Manish Jadhav

मडगाव: राय - सासष्टी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणीने नोकरी नसल्याने गळफास घेवून आपले जीवन संपवले. नोकरी मिळत नसल्याने ही तरुणी मानसिक तणवाखाली होती. यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचल्याचे मायणा कुडतरी पोलिसांनी सांगितले. मंजुषा मांजरेकर असे या 24 वर्षीय पीडितेचे नाव आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

राय सासष्टी येथे एका भाड्याच्‍या घरात राहणाऱ्या 24 वर्षीय मंजुषाने नोकरी मिळत नसल्याने आपले जीवन संपवले. मंजुषा गेल्या काही दिवसांपासून नोकरी मिळत नसल्याने मानसिक तणावाखाली होती. यातूनच तिने हे धक्कादायक पाऊल उचलले, अशी माहिती मायणा कुडतरी पोलिसांनी दिली.

मंगळवारी (8 एप्रिल) दुपारी 2.30 वाजता हा धक्कादायक प्रकार लक्षात आल्‍यानंतर खिडकी उघडून तिचा मृतदेह बाहेर काढण्‍यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस (Police) उपनिरीक्षक वेरोनिका कुतिन्‍हो करत आहेत.

काही दिवसांपूर्वी, कटा आमोणा येथूनही अशीच एक घटना समोर आली होती. येथील एका 37 वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरी जीवन संपवले होते. बेडरुममधील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला होता. घटनेच्या वेळी घरी तो एकटाच होता.

आई आणि बहिण धार्मिक समारंभासाठी बाहेर गेल्या होत्या. नैराश्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT