Anmod Checkpost Illegal liquor Dainik Gomantak
गोवा

Anmod Check Post : कारवाईचे सत्र सुरुच; अनमोड चेक नाक्यावर मोठा दारुसाठा जप्त

संशयित गोव्यातून कर्नाटकात मासे वाहतूक करत होता

Rajat Sawant

Anmod Checkpost : गोवा राज्यातून अवैधरित्या परराज्यात दारु वाहतुकीवर बंदी आहे. परंतु बंदी असतानाही दारु वाहतूक होत असल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. दारु वाहतूक करताना आरोपींकडून वेगवेगळ्या पध्दतींचा वापर केला जातो. अशातच गोवा राज्यातून कर्नाटकात अवैधरित्या दारुसाठा घेऊन जाणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत संशयिताकडून 207 लीटर गोवा बनावटीची दारु व वाहन असे मिळून सुमारे 7 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाईत अनमोड अबकारी विभागाकडून करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, आज रविवारी चालक सय्यद अमीर जान हा बोलेरो पिकपमधून गोवा बनावटीचा 207 लीटर दारुसाठा घेऊन जात होता. यावेळी तो अनमोड तपासणी नाक्यावर आला असता अबकारी विभागाकडून त्याला तपासणीसाठी थांबवण्यात आले. यावेळी वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये दारुसाठा आढळून आला. याप्रकरणी अबकारी खात्याने चालक संशयित सय्यद अमीर जान (बंगळूरु) याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला संशयित गोव्यातून कर्नाटकात मासे वाहतूक करत होता. याबाबत अधिक तपास सुरु आहे.

अनमोड येथील अबकारी चेकपोस्टवर काही दिवसांपूर्वी एका ट्रकमध्ये दारु साठा जप्त करण्यात आला होता. या कारवाईत 13 लाखांहून अधिक किंमतीचा दारुसाठा जप्त करण्यात आला होता. तपासणी दरम्यान ट्रकमध्ये विविध ब्रॅंड्सची गोवा बनावटीची 57 लीटर दारु आढळून आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT