Court Canva
गोवा

Goa Court Verdict: 'मी मैत्रिणीच्या घरी होते'! पीडितेने दिली नाही साथ, अपुरे पुरावे; अल्पवयीन मुलीच्या अपहरण, अत्याचारप्रकरणी आरोपी निर्दोष

Goa Crime News: साक्षीदारांनी बदललेली साक्ष, उपलब्ध न झालेले वैद्यकीय पुरावे आणि पीडित मुलीनेही न दिलेली साथ, या कारणांमुळे आरोपीला संशयाचा लाभ देण्यात आल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: २०२१ मधील अल्पवयीन मुलीचे अपहरण, लैंगिक अत्याचार प्रकरणी फास्ट ट्रॅक विशेष न्यायालयाने संशयित आरोपीला निर्दोष मुक्त केले. साक्षीदारांनी बदललेली साक्ष, उपलब्ध न झालेले वैद्यकीय पुरावे आणि पीडित मुलीनेही न दिलेली साथ, या कारणांमुळे आरोपीला संशयाचा लाभ देण्यात आल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.

सदर संशयित आरोपीवर भारतीय न्‍यायदंड संहितेच्‍या कलम ३६३ (अपहरण), कलम ३७६ (बलात्कार) तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्‍सो) अंतर्गत कलम ४ आणि ८ नुसार गंभीर आरोप ठेवण्यात आले होते.

महत्त्वाचे म्हणजे, पीडित मुलीने वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिला. परिणामी न्यायालयाला कोणतेही ठोस वैद्यकीय पुरावे सादर करता आले नाहीत. तसेच मुलीचे वडील आणि भाऊ यांनीही खटल्याला पाठिंबा दिला नाही. वडिलांनी न्यायालयात स्पष्ट सांगितले की, त्यांना संशयित आरोपीची ओळख नाही आणि मुलगी तीन दिवसांनी स्वतःहून परत आली होती. त्या काळात ती एका मैत्रिणीच्या घरी असल्याचे तिने आपल्या काकांना फोनवर सांगितले होते.

साक्षीदारांनी मारली पलटी

घटनास्थळी पंच म्हणून उपस्थित असलेल्या दोन साक्षीदारांनी न्यायालयात सांगितले की, पोलिसांनी दिलेल्या कागदांवर त्यांनी केवळ सही केली होती आणि घटनास्थळी प्रत्यक्ष काही पाहिले नाही. अशा परिस्थितीत न्यायालयाने निरीक्षण नोंदविले की, ना ठोस पुरावे, ना ओळख, ना वैद्यकीय पुष्टी, त्यामुळे संशयित आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध होऊ शकत नाही.

न्यायालयाने नोंदविलेले निरीक्षण

सर्व पुरावे व साक्षी तपासल्यानंतर न्यायालयाने नमूद केले की, सदर गुन्ह्यात संशयित आरोपी खरोखरच सहभागी होता का, याबाबत शंका निर्माण होते. म्हणूनच संशयाचा लाभ देऊन त्‍याची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. संशयिताला १५ डिसेंबर २०२१ रोजी अटक करण्यात आली होती आणि १ फेब्रुवारी २०२२ रोजी जामिनावर सोडण्यात आले होते.

प्रकरणाची पार्श्वभूमी अशी

११ डिसेंबर २०२१ रोजी पीडित मुलगी शाळेतून घरी परतली नाही. दुसऱ्या दिवशी तिच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर अपहरण, लैंगिक अत्याचाराचे आरोप ठेवले. मात्र खटला न्यायालयात आल्यानंतर प्रकरणाची पायाभरणीच डळमळली. न्यायालयात मुलीने दिलेल्या जबानीत तिनेच संशयित आरोपीची ओळख पटविण्यास नकार दिला. शिवाय, तिने पोलिसांसमोर दिलेली प्राथमिक जबानीही फिरविली.

काय होते आरोप?

अपहरण : कलम ३६३

बलात्कार : कलम ३७६

पोक्सो कलम ४ व ८

प्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे

मुलगी शाळेतून घरी न आल्याने तक्रार

तीन दिवसांनी ती स्वतःहून घरी परतली

वैद्यकीय तपासणी नाकारली

पंच, साक्षीदारांनी मारली कोलांटी

त्‍यामुळे संशयिताला संशयाचा लाभ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA 2nd Test: 'करो या मरो' कसोटीत भारत रचणार इतिहास, वर्ल्ड क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा ठरणार तिसरा देश; इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या यादीत होणार सामील

Ranji Trophy 2025: गोव्याने पत्करला डावाने दारुण पराभव, रणजी क्रिकेट स्पर्धेत सलग दुसरा सामना गमावला; सौराष्ट्राची प्रगती

अग्रलेख: हॉटेल, रेल्वे, रस्ते... सर्वत्र ट्रॅकिंग! गोव्यात 'चोरांचा माग' काढण्यासाठी 'रियल-टाईम' प्रणाली आवश्यक

125 वर्षांची कोकणी कला लंडनमध्ये! वर्षा उसगावकर यांनी सादर केलं 'तियात्र'; Video Viral

अग्रलेख: 'घर घर मे दिवाली है, मेरे घर मे अंधेरा' गोमंतकीय सिनेकर्मींची अवस्था

SCROLL FOR NEXT