Goa Court Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: चोरीची तक्रार केली म्हणून रेस्टॉरंट मालकाचा काढला काटा; सहा वर्षानंतर दोघांना जन्मठेप, 1 लाख दंड

Goa Murder Case: ७ ऑगस्ट २०१८ रोजी विश्वजीत सिंह यांनी त्यांच्या एका कर्मचाऱ्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Murder Case

पणजी: म्हापसा सत्र न्यायालयाने कांदोळी येथे २०१८ साली झालेल्या रेस्टॉरंट मालक विश्वजीत सिंह यांच्या हत्येप्रकरणी दोघा आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. हा निवाडा जिल्हा न्यायाधीश शर्मिला पाटील यांनी दिला.

याबाबत अधिक माहिती अशी की, ७ ऑगस्ट २०१८ रोजी विश्वजीत सिंह यांनी त्यांच्या एका कर्मचाऱ्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. उमेश लामणी (रा. कांदोळी, गोवा) याने सिंह यांची रॉयल एनफिल्ड बुलेट दुचाकी चोरून परत न केल्यामुळे त्यांनी तक्रार नोंदवली होती.

पोलिसांची भरीव कामगिरी

या घटनेनंतर आरोपींना कर्नाटकातून अटक करण्यात आली. कळंगुटचे तत्कालीन पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात आला.

या प्रकरणात हत्येसाठी वापरलेली शस्त्रे, साक्षीदारांची ओळख, पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजही जप्त करण्यात आले. २०१८ सालातच संशयितांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

सहा वर्षे चालला खटला

तब्बल सहा वर्षे चाललेल्या या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने ४२ साक्षीदार आणि डिजिटल पुराव्यांचे परीक्षण केले. दोघा आरोपींच्या जामिनाच्या अर्जानाही वारंवार नकार देण्यात आला. त्यामुळे या दोघांना त्यांची केलेल्या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

सत्र न्यायालयाने आरोपींना भादंवि कलम ३०२ अंतर्गत जन्मठेपेची तसेच ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. तसेच शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ५ व २७ अंतर्गत ३ वर्षे कारावासाची शिक्षा दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: 'कॅश फॉर जॉब प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची गरज नाही'; वाचा ठळक बातम्या

Cash For Job Scam: दोन सरकारी कर्मचाऱ्यांसह 33 जणांना अटक; राजकीय कनेक्शनबाबत गोवा पोलिसांनी केला महत्वाचा खुलासा

Cash For Job प्रकरणात सत्तरीतील युवकाला अटक! डिचोलीतील पाचजणांकडून उकळले 21.5 लाख

Jaipur - Goa Flight: पर्यटकांसाठी खूशखबर! गुलाबी शहरातून गोव्यासाठी सुरु होणार आणखी एक फ्लाईट

Cash For Job Scam: बाबूशचा संताप

SCROLL FOR NEXT