Parra Rioting Case Dainik Gomantak
गोवा

Parra Rioting Case: 2013 पर्रा दंगल प्रकरण; 'त्या' चार नायजेरियन नागरिकांची निर्दोष मुक्तता

ऑक्टोबर 2013 च्या दंगल प्रकरणात चार नायजेरियन नागरिकांची म्हापसा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

Pramod Yadav

ऑक्टोबर 2013 च्या पर्रा दंगल प्रकरणात चार नायजेरियन नागरिकांची म्हापसा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. लोबो वाडो, पार्रा येथे घडली होती. नायजेरियन नागरिकांनी पर्वरी येथे राष्ट्रीय महामार्ग-17 वर रस्ता रोखो केले होते.

"पोलिस अधिकार्‍यांवर बळाचा वापर केल्याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. कोणत्याही प्रकारचा प्राणघातक हल्लाही सिद्ध झाला नाही." असे म्हापसा न्यायालयाने म्हटले आहे.

संडे ओन्ये लकी, मवाचुकवू एल्ग्वेडिम्मे, अरेन्झ उकेमोझी आणि इफेनिल पास्कोल अशी निर्दोष सुटका करण्यात आलेल्या चार नायजेरियन नागरिकांची नावे आहेत.

या प्रकरणात फरार असलेल्या आणि ज्यांच्यावर कोणताही आरोप ठेवण्यात आलेला नाही अशा अन्य 15 आरोपींना स्टँडिंग वॉरंट जारी करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

या प्रकरणात नायजेरियन संशयितांवर धमकी देणे, दंगा करणे, हल्ला करणे, सरकारी अधिकाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करण, गुन्हेगारी बळाचा वापर करणे आणि इतर गुन्ह्यांचा आरोप ठेवण्यात आले होते.

दरम्यान, "संशयित आरोपी जर उपद्रव निर्माण करत असतील, पोलिस अधिकार्‍यांना त्यांचे कायदेशीर कर्तव्य बजावण्यापासून किंवा कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यापासून रोखत असतील, तर त्यांना लोबो वाडो, पर्रा येथी घटनास्थळी का अटक करण्यात आली नाही," असे निलिमा काणकोणकर म्हणाल्या.

"जमलेला जमाव मृत नायजेरियन नागरिक ओबोडो उझोना सिमोन याचा मृतदेह पाहण्यासाठी जमा झाले होते, त्यावरून त्यांचा जमाव बेकायदेशीर होता असा निष्कर्ष काढता येणार नाही. असे न्यायालयाने म्हटले आहे.

गुन्हा 31 ऑक्टोबर 2013 रोजी घडला होता, परंतु घटनेचा पंचनामा दुसऱ्या दिवशी करण्यात आला. तपास अधिकाऱ्यांना पंचनामा त्याच दिवशी करण्यास कशामुळे प्रतिबंधित केले असेही न्यायालयाने म्हटले आहे.

कोर्टाने पुढे असे म्हटले की, तपास अधिकाऱ्याने सांगितले की तक्रारीत नमूद केलेल्या 20 आरोपींची नावे सर्व बाबतीत बरोबर आहेत की नाही हे ते सांगू शकत नाही, कारण त्यांनी कोणतीही कागदपत्रे किंवा पासपोर्टसह त्याची पडताळणी केलेली नाही.

नेमकं प्रकरण काय?

ऑक्‍टोबर 2013 मध्ये शेवटच्या आठवड्यात पर्रा येथे नायजेरियन नागरिक ओबोडो सिमोन मृतावस्थेत आढळून आला होता, त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, त्यानंतर नायजेरियन नागरिकांनी त्यांच्या देशबांधवांना घेऊन जाणारी श्रवण व्हॅन अडवली, ज्यामुळे कथित दंगल झाली. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यावेळी या हत्येचा अमली पदार्थांच्या व्यापाराशी संबंध असल्याचे म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Match Fixing: क्रिकेट विश्वात मोठा भूकंप! टी-20 वर्ल्ड कपमध्ये फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी-करप्शन युनिटकडून चौकशी सुरु

Horoscope April 2026: 30 एप्रिलपर्यंत 'नो रिस्क'! ग्रहांची बदलली चाल, मेष राशीचं वाढलं टेन्शन; चुकीच्या निर्णयामुळे अडकू शकता संकटाच्या चक्रव्यूहात

GCA Premier League: धेंपो क्लबची अर्धी मोहीम फत्ते, 'चौगुले'विरुद्ध 646 धावांचा डोंगर; स्नेहलचे द्विशतक, जीवनचे शतक

VIDEO: वैमानिकाची एक चूक अन् 8 प्रवाशांचा खेळ खल्लास, 5 मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं; इंडोनेशियातील बोर्नियो बेटावर हेलिकॉप्टर क्रॅश

Watch Video: अय्यरच्या 'सुपरमॅन' अवतारावर रोहित-सूर्याचे विस्फारले डोळे, चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला; श्रेयसचा धडाकेबाज कॅच व्हायरल

SCROLL FOR NEXT