Officials of Fisheries Department jammed twenty boats in goa Dainik Gomantak
गोवा

वेळसाव येथे 20 मासेमारी होड्या जप्त

मासळीचा लिलाव : पारंपरिक मच्छीमारांचा छळ होत असल्याचा आरोप

दैनिक गोमन्तक

वास्को : मासेमारी बंदी असताना वेळसाव किनाऱ्यावर स्थानिक होडी मालकांनी मासेमारी केल्याप्रकरणी मत्स्योद्योग खात्याच्या अधिकाऱ्यांनी 20 नौका जाम करून त्यातील 364 किलो मासळीचा लिलाव केला. दुसरीकडे मासेमारी बंदी पारंपरिक मच्छीमारांना लागू होत नसतानाही संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांचा छळ होत असल्याचा आरोप अखिल गोवा मच्छीमारी बोटमालक संघटनेचे अध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा तसेच पारंपरिक मच्छीमारांनी केला आहे.

सोलर सुंगटे जेव्हा दिसतात तेव्हाच ती पकडण्याची गरज असते; अन्यथा ती समुद्रात गायब होतात. यासंबंधी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना अनेकदा समजावून सांगितले आहे. परंतु त्यासंबंधी समर्पक उत्तर देण्याऐवजी ते दंड ठोठावतात, असे डिसोझा यांनी सांगितले. लहान बोटमालक आर्थिक अडचणीत आहेत. मच्छीमारी व्यवसाय कायदा सगळ्याच बोटमालकांना लागू होतो. त्यामुळे सर्वांना एकच कायदा लागू करा, असे डिसोझा म्हणाले.

मासेमारी बंदी असतानाही वेळसाव येथे होडी मालकांनी मासेमारी केल्याची माहिती मिळताच संबंधित खात्याचे अधिकारी किनाऱ्यावर दाखल झाले. यावेळी त्यांच्या तावडीत 20 मासेमारी होड्या सापडल्या. जप्त करण्यात आलेल्या मासळीचा सुमारे 47 हजार 320 रुपयांना लिलाव करण्यात आला. ही कारवाई मत्स्योद्योग खात्याच्या अधीक्षक रोहिता नाईक, साहाय्यक अधीक्षक रोशनी नाईक, अधिकारी रवी रॉड्रिग्स, सागर नाईक, दीपक कुंकळ्ळीकर, गोपाळ जुवाटकर यांनी केली. त्यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी वेर्णा पोलिस स्थानकाचे निरीक्षक डायगो ग्रासियस व पोलिस उपस्थित होते.

न्यायालयाच्या आदेशानुसार पारंपरिक मच्छीमारांना 9.9 एचपीची मोटर असलेली होडी वापरून मासेमारी करता येते. मात्र समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाताना सुरक्षिततेचा उपाय म्हणून आम्ही सोबत अतिरिक्त मोटर ठेवतो. त्यामुळे बंदी आदेश मोडून आम्ही मासेमारी केली, हे असत्य असल्याचा दावा पारंपरिक मच्छीमारांनी केला आहे.

मत्स्योद्योगमंत्र्यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा करून न्याय मागणार असल्याचे अखिल गोवा मच्छीमारी बोटमालक संघटनेचे अध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी सांगितले. लहान बोट मच्छीमारी व्यावसायिक सोलर सुंगटे पकडून काही प्रमाणात आपला खर्च भागवतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे अयोग्य असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT