Fake Currency Dainik Gomantak
गोवा

बनावट नोटांप्रकरणी मुख्य संशयितासह एकाच्या मुसक्या आवळल्या

आंतरराज्य बनावट नोटा प्रकरणातील टोळीतील आणखी दोघांना मडगावात अटक

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : बनावट नोटा वितरित करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील आणखी दोन संशयिताना कारवार पोलिसांनी गुरुवारी मडगावातून ताब्यात घेतले. ही टोळी 500 रुपयाच्या एका नोटेला बनावट 4 नोटा देत होती अशी माहिती पुढे आली आहे.

कारवार पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे मुश्ताक हुसेन बेग (43) आणि अफझल हुसेन बेग (45) अशी नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून बनावट नोटा, प्रिंटर आणि बनावट नोटा छापण्याचे इतर साहित्य जप्त केले आहे. त्यांना मदत करणारे त्यांचे कुटुंबीय सीमा बेग आणि अष्मा बेग यांनाही कारवार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

यापूर्वी 7 मे रोजी कारवार पोलिसांनी कारवार येथील एका हॉटेलवर धाड घालून प्रवीण नायर, लोयड स्टिव्हस, लार्सन सिल्वा व प्रनोय फेर्नांडिस यांना अटक केली होती. बनावट नोटा प्रकरणी यापूर्वीच अटकेत असलेल्या चारही आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मडगाव, फातोर्डातील अटक करण्यात आलेल्या तीन संशयितांसह चौघांनाही 14 दिवसांची पोलीस कोठडी कोर्टाने सुनावली आहे. कारवार पोलिसांकडून मुख्य संशयित मुश्ताक बेग याचा शोध अजूनही सुरुच होता. अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT