1st to 8th standard schools in Goa will be started  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील पहिली ते आठवी शाळेची घंटा वाजणार

नववीपासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतचे शिक्षण ऑनलाईनऐवजी ऑफलाइन करावे असे शिक्षण खात्याने सूचल्याने. सध्या हे शिक्षण ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात (Goa) नियंत्रणात असलेली कोविड (Covid-19) महामारी, विद्यार्थ्यांचे नुकसान आणि पालकांची शाळा सुरू (Schools Reopen) करण्याची मागणी यावर वैद्यकीय तज्ज्ञ कमिटीने सविस्तर चर्चा करून शाळा सुरू करण्याचा सल्ला राज्य सरकारला (Goa Government) दिल्याने ‘एसओपी’चे (SOP) पालन करत दिवाळी नंतरच्या नव्या सत्रापासून पहिली ते आठवीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून बंद असलेली प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक वर्गांची घंटा आता पुन्हा वाजणार आहे.

कोरोनामुळे सलग दोन वर्षांपासून राज्यातील प्राथमिक माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालये बंद होती. त्यापैकी नववीपासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतचे शिक्षण ऑनलाईनऐवजी ऑफलाइन करावे असे शिक्षण खात्याने सूचल्याने. सध्या हे शिक्षण ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने सुरू आहे. आता नव्याने सुरू होणाऱ्या दुसऱ्या सत्रापासून पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा सल्ला दीर्घ चर्चेअंती तज्ज्ञ समितीने दिला आहे. यासाठी समितीने विविध प्रकारचे विचार विमर्श मुद्दे लक्षात घेऊन 23 सदस्यीय समितीने हा सल्ला दिला आहे . यावर कृतीदल चर्चा करून या आठवड्यात अंतिम निर्णय घेईल. सध्या अनेक शाळांना जागेचा प्रश्न असून कोरोना नियमानुसार शाळा सुरू करणे शक्य नाही त्यामुळे कोरोनाच्या संदर्भात आदर्श कार्य प्रणालीत (एसओपी) सुधारणा करणे गरजेचे असल्याचे शाळा प्रशासनाचे मत आहे.

सध्या ‘कोरोना’ लागण दर आणि मृत्यूदर दोन्ही ही नियंत्रणात आहेत. दुसरी लाट अद्यापही संपलेली नसली तरी सध्या ती पूर्णतः नियंत्रणात आहे. तिसरी लाट आलीच तर ती सौम्य असण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर व्यक्त करत आहेत. त्यामुळे सर्व वर्ग सुरू करण्यात कोणतीच हरकत नाही.

- डॉ. शेखर साळकर, सदस्य - तज्ज्ञ समिती.

तज्ज्ञ समितीचा सकारात्मक सल्ला

  •  पॉझिटिव्हिटी रेट 1 टक्क्यांपेक्षा कमी

  •   मुलांमध्ये कोरोनाचे प्रमाण कमी, संसर्गाचा परिणाम नाही

  •   नव्याने मुले रुग्णालयात भरती नाहीत

  •   राज्यातील 70 टक्के मुलांमध्ये अँटीबॉडी तयार

  •   शाळा सुरू करूनही प्रसार नाही

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT