Panchayat Elections in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat Election : पंचायत पोटनिवडणूक; 19 उमेदवार रिंगणात

पोटनिवडणूकीचा गेल्या काही दिवसांपासूनच प्रचार सुरू झाला

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Panchayat Election : येत्या 25 मार्चला 7 ग्रामपंचायतींच्या 7 प्रभागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात 19 उमेदवार राहिले आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये दोन तसेच त्यापेक्षा अधिक उमेदवार असल्याने ही लढत अटीतटीची होणार आहे.

आज 4 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. मतदारांची संख्या पाचशेपेक्षा कमी असल्याने उमेदवारांमध्ये मतदारांची मते मिळवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासूनच प्रचार सुरू झाला आहे.

आज अर्ज घेण्याच्या दिवशी वेळगेमधून सर्वेश गावकर, बाळ्ळी-अडणेमधून धाकू नाईक, कालेमधून बापो शेळको व नितेश नाईक या दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.

तीन पंचायतीमध्ये दुहेरी, तीनमध्ये तिरंगी तर बाळ्ळी-अडणेमध्ये चौरंगी लढत होणार आहे. ओर्ली पंचायतीच्या प्रभाग 6 मध्ये सर्वाधिक कमी एकूण 181 मतदार व 3 उमेदवार आहेत. त्यामुळे येथे अटीतटीची लढत अपेक्षित आहे.

म्‍हावळिंगे-कुडचिरे पंचायतीच्या प्रभागात सर्वाधिक जास्त 485 मतदार आहेत. या सात पंचायतींमध्ये 2465 मतदार आहेत. त्‍यात 1226 पुरुष तर 1239 महिला मतदारांचा समावेश आहे, अशी माहिती आयोगाचे साहाय्यक संचालक सागर गुरव यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

Sheikh Hasina Press Conference: 'मी जेल आणि मृत्यूला घाबरत नाही!', शेख हसीना यांचा मायदेशी परतण्याचा थेट इशारा; भारतातील पत्रकार परिषदेने उडवली खळबळ

SCROLL FOR NEXT