Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Minister Rane: गोवा आरोग्य विभागाच्या ताफ्यात 19 रुग्णवाहिका, 2 शववाहिकांची भर! जनतेच्या दारात आरोग्यसेवा पोचवण्यासाठी कटीबद्ध; मंत्री राणे

Vishwajit Rane News: डिस्ट्रिक्ट मिनरल फाऊंडेशन आणि मॉल्बियो डायग्नोस्टिक्स यांच्या सीएसआर उपक्रमातून प्रदान केलेल्या १९ रुग्णवाहिका आणि दोन शववाहिकांचे लोकार्पण गोवा आरोग्य संचालनालयाच्या आवारात मंत्री राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: डिस्ट्रिक्ट मिनरल फाऊंडेशन आणि मॉल्बियो डायग्नोस्टिक्स यांच्या सीएसआर उपक्रमातून प्रदान केलेल्या १९ रुग्णवाहिका आणि दोन शववाहिकांचे लोकार्पण शुक्रवारी गोवा आरोग्य संचालनालयाच्या आवारात मंत्री राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आरोग्य मंत्री विश्‍वजीत राणे म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा मिनरल निधीतून या रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. आमदार राजेश फळदेसाई यांनी केलेल्या विनंतीनुसार दिवाडी येथे नवी रुग्णवाहिका उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले आहे. १८ वर्षांपूर्वी ही रुग्णवाहिका सेवा सुरू केली होती.

राज्यातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने ते पाऊल उचलले होते. आता ही सेवा जीवनरेखा बनली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारच्या माध्यमातून सर्व जनतेच्या दारात आरोग्यसेवा पोहोचली जावी, यासाठी काम केले जात आहे. मोल्बिया डायग्नोस्टिकने शववाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत, गरीब लोकांसाठी ही मोफत सेवा आहे. ती कधीच बंद होणार नाही.

ते पुढे म्हणाले, १०८ ही देशात सर्वाधिक सर्वोत्तम प्रतिसाद मिळणारी सेवा आहे. पाच कार्डियाक रुग्णवाहिका मिळाल्याने त्यांचा राज्याला फायदा होणार आहे. गोमेकॉतील केअर टेकर्स सेवा बंद करणार नाही. कारण अनेक कुटुंबांनी माझ्याकडे याविषयी विनंती केली. त्यासाठी डेटाबेस सुविधा आणली जाणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.

‘मॉल्बियो’कडून दर्जेदार आरोग्य सेवा

मॉल्बियो ही कंपनी प्रगत पोर्टेबल प्लॅटफॉर्मद्वारे दर्जेदार आरोग्यसेवा पुरविण्यात आघाडीवर आहे. या कंपनीने संसर्गजन्य रोग व्यवस्थापनासाठी देशात प्राथमिक आरोग्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. जगभरातील दुर्गम, संसाधन-मर्यादित भौगोलिक क्षेत्रांना टीबी आणि हिपॅटायटीस यासारख्या संसर्गजन्य रोगांपासून ते असंसर्गजन्य रोग जसे की स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग, सिकलसेल रोग आणि बरेच काही यासाठी अत्याधुनिक निदान करण्यासाठी ‘मॉल्बियो’चा उपयोग होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT