Goa Cashew Rates| Altone DCosta Dainik Gomantak
गोवा

Goa Cashew Rates: काजूला 175 रु. भाव ही काँग्रेसचीच मागणी : एल्टन डिकॉस्टा

Goa Cashew Rates: हिंमत असल्यास सरकारने अधिसूचना जारी करावी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Cashew Rates

मडगाव, गोव्यातील काजूला रु. 175 प्रति किलो आधारभूत किंमत द्यावी, ही माझी गेल्या दोन वर्षांपासूनची मागणी आहे. आता लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून कृषी विभागाने काजूला रु.170 रुपये आधारभूत किंमत देण्याचा प्रस्ताव पुढे केल्याचे समजते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ताबडतोब 175 प्रति किलो दराची अधिसूचना जारी करावी, आणि त्याचे श्रेय केवळ काँग्रेस पक्षाला द्यावे, अशी मागणी केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी केली आहे.

कृषी विभागाने काजूला 170 रुपये आधारभूत किंमत देण्याच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया देताना एल्टन डिकॉस्टा यांनी, निवडणुकीत फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांना आमिष दाखविण्याचा भाजपचा हा ‘निवडणूक जुमला’ आहे असा आरोप केला आहे.

सरकारला हिंमत असेल तर त्वरित अधिसूचना जारी करावी. परंतु, माझ्या आणि काँग्रेस पक्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच भाजप सरकारला आधारभूत किंमत वाढवणे भाग पडले हे सत्य आहे, असा दावा एल्टन डिकॉस्टा यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी मी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काजू उत्पादकांची दुर्दशा दाखवली होती. लोकांनी त्या व्हिडिओत मागणी नसल्यामुळे काजूबियांसह फळ कसे सडण्यासाठी सोडले जाते, हे पाहिले होते. शेतकरी रडताना सरकार कार्यक्रमांत व्यग्र होते, टोला त्यांनी हाणला.

सरकारचे जुमले बाजीच्या कलेवर प्रभुत्व !

राज्यातील भाजप सरकारने जुमले बाजीच्या कलेवर प्रभुत्व मिळवले आहे. मोठमोठ्या घोषणा करायच्या पण अंमलबजावणी मात्र होत नाही. अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीत 35 टक्के उत्तीर्ण होण्यातही हे सरकार अपयशी ठरले आहे, असे एल्टन डिकॉस्टा यांनी नमूद केले.

मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की, जोपर्यंत 175 रुपये प्रति किलो आधारभूत किंमत असलेली अधिसूचना जाहीर होत नाही, आणि वास्तविक पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाहीत, तोपर्यंत या सरकारवर विश्वास ठेवू नका, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT