Pakistani Pilgrims in Goa Dainik Gomantak
गोवा

Saint Francis Xavier Exposition: गोंयचो सायब पावलो!! पाकिस्तानी भाविकांचा गोव्यात येण्याचा मार्ग मोकळा; व्हिसा मंजूर

Pakistani Pilgrims at Exposition Goa: इस्लामाबादमधील उच्चायुक्तांनी व्हिसा मंजूर केल्यामुळे आता पाकिस्तानस्थित गोमंतकीय गोव्यात येण्याची शक्यता आहे.

Akshata Chhatre

Pakistan Pilgrims in Goa for exposition 2024

ओल्ड गोवा: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र शव प्रदर्शनाला हजर राहण्यास उत्सुक असलेल्या पाकिस्तानमधील भाविकांना गोव्यात येण्याची संधी मिळाली आहे. इस्लामाबादमधील उच्चायुक्तांनी त्यांचा व्हिसा मंजूर केल्यामुळे आता किमान 170 पाकिस्तानस्थित गोमंतकीय गोव्यात येण्याची शक्यता आहे.

28 नोव्हेंबर रोजी काराचीहून 85 यात्रेकरूंचा पहिला समूह गोव्यात येईल आणि त्यांनतर 20 डिसेंबरच्या आसपास आणखीन पाकिस्तानी गोमंतकीय शव प्रदर्शन सोहळा तसेच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात येणार आहेत. गोयेकरज ओन अकादमी नावाची एक संस्था या यात्रेकरूंच्या येण्याजाण्याची व्यवस्था करणार आहे.

कराचीहून गोव्याला येणारे यात्रेकरू कराचीमधील विविध चर्चचे सदस्य आहेत आहेत यांमध्ये ज्यात सेंट अँथनी चर्च, सेंट पॅट्रिक चर्च, अवर लेडी ऑफ फातिमा चर्च आणि सेंट लॉरेन्स चर्च यांचा समावेश होतो. कराची ते मुंबई थेट विमानसेवा नसल्यामुळे, काही यात्रेकरू दुबई मार्गे तर काही श्रीलंकेमार्गे गोव्याला येणार आहेत. या प्रवासासाठी प्रत्येक यात्रेकरूला सुमारे 2 लाख रुपये मोजावे लागणार आहेत.

दूसऱ्या आणि तिसऱ्या पिढीतील गोमंतकियांचे काही वंशज कराचीमध्ये राहतात आणि म्हणूनच ते बऱ्याच काळानंतर पुन्हा गोव्याला जाण्याची अपेक्षा बाळगून आहेत. काही भाविकांनी गोव्यात एक ते दीड महिने मुक्कामाचा बेतही आखलाय. पुन्हा कधी भारताचा व्हिसा मिळणार याची शाश्वती नसल्याने आता संधी मिळालीये तर गोव्यात काही दिवस थांबू, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानातील भाविकाने काही दिवसांपूर्वी टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राला दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT