Goa Crime  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: साडेपाच वर्षांत १६९ जणांचे खून; यावर्षी १५ हत्यांची नोंद

Goa Police: ९० टक्क्यांपेक्षा अधिक प्रकरणांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यात गेल्या साडेपाच वर्षात १६९ खुनांची नोंद झाली असून त्यापैकी ९० टक्क्यांपेक्षा अधिक प्रकरणांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. यावर्षी १५ खुनांची नोंद झाली आहे.

ही प्रकरणे वगळल्यास बहुतेक प्रकरणांमध्ये आरोपपत्रे सादर झाली आहेत. त्यातील काही प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झाली आहे तर उर्वरित प्रकरणांत खटले सुरू आहे. काही प्रकरणांमध्ये पोलिस तपासातील त्रुटींमुळे आरोपी निर्दोष सुटले आहेत.

विधानसभेत लेखी उत्तरादाखल दिलेल्या माहितीनुसार राज्यात २०१९ मध्ये ३३, २०२० मध्ये ३४, २०२१ मध्ये २६, २०२२ मध्ये ४४, २०२३ मध्ये २६ तर २०२४ पर्यंत १५ खुनांची प्रकरणे नोंद झाली आहेत. खूनप्रकरणे २०२२ मध्ये अचानक वाढली होती, मात्र २०२३ मध्ये हे प्रमाण ४०.९१ टक्क्यांनी कमी झाले आहे.

गंभीर गुन्हे टाळण्यासाठी विविध भागांत पोलिस गस्त ठेवण्यात येत आहे. महामार्ग गस्त, मोटारसायकल गस्त तसेच चालती गस्त ठेवण्यात येत आहे. रात्रीच्यावेळी जर कोणी संशयास्पद आढळल्यास त्याची चौकशी केली जाते व तो माहिती देत नसल्यास त्याला पोलिस स्थानकावर आणले जाते.

गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्यांची वेळोवेळी त्यांना पोलिस स्थानकात बोलावून चौकशी केली जाते, तसेच ताकीदही दिली जाते. काहीजण शिक्षा भोगून बाहेर आले आहेत, त्यांच्या कारवायांवरही नजर ठेवली जात आहे.

४८ तास तपासात महत्त्वाचे

राज्यातील खुनाची बहुतांश प्रकरणे गोवा पोलिसांनी ४८ तसात सोडवलेली आहेत. या काळात अधिकाधिक धागेदोरे तसेच माहिती जमवण्याचे लक्ष पोलिसांसमोर असते. त्यासाठी अनेक पोलिस पथके स्थापन करून विविध दिशेने तपासकाम केले जाते. वास्कोतील एका वृद्धेचा खून करून पसार झालेल्या संशयितांना गोवा पोलिसांनी कोणतीही माहिती समोर नसताना अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने गोव्याबाहेरून पकडून आणले होते, अशी माहिती वरिष्ठ पोलिसांनी दिली.

संशयितांवर करडी नजर

गोव्याबाहेरून येणाऱ्या परप्रांतीयांवर बसस्थानके, रेल्वेस्थानके तसेच क्रुझ बोटीच्या ठिकाणी साध्या पोलिस वेशातील पोलिस तैनात करून तेथे दक्षता ठेवली जाते. रात्री नाकाबंदी करून गोव्यात प्रवेश करू इच्छिनाऱ्यांवर आंतरराज्य टोळींवर नजर ठेवली जाते. संशयितांवर नजर ठेवण्यासाठी पोलिस खात्याकडून विशेष पोलिस कक्ष स्थापन करण्यात आलेले नाही. सध्या पोलिसांची कमतरता आहे, तरीही पोलिस स्थानक तसेच क्राईम ब्रँचच्या समन्वयाने अनेक खुनाची प्रकरणे सोडवण्यात खात्याला यश आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT