Water Supply in Goa Dainik Gomantak
गोवा

आता बहुमजली निवासी इमारतींनाही मिळणार मोफत पाणी!

दीड लाख फ्लॅटधारकांना होणार फायदा; तूर्तास 1.10 लाख घरांना मिळतंय मोफत पाणी

दैनिक गोमन्तक

मडगाव : बहुमजली इमारती आणि गृहनिर्माण सोसायट्यातील फ्लॅट्सनाही आता एकेरी घराप्रमाणे दरमहा 16 हजार लिटर (16 युनिट) पाणी मोफत देण्याचा जो सार्वजनिक बांधकाम खात्याने निर्णय घेतला आहे, त्याचा फायदा किमान दीड लाख फ्लॅटधारकांना होणार आहे. सुमारे 6000 इमारती आणि सोसायट्या आता या योजनेखाली येणार आहेत.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाचे मुख्य अभियंता संतोष सामंत यांना विचारले असता, सध्या 1.10 लाख एकेरी घरांना या योजनेखाली 16 युनिट मोफत पाणी मिळत आहे. मात्र, आता ही योजना आता बहुमजली इमारतींना लागू करायची असल्यास या योजनेखाली नेमके किती फ्लॅट्स येतील त्याची यादी तयार करावी लागेल असे त्यांनी सांगितले.
गोव्यात ही योजना मागच्या सप्टेंबर महिन्यापासून लागू झाली आहे. मात्र, ही सवलत आतापर्यंत एकेरी घरांनाच मिळत होती.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या परिपत्रकाप्रमाणे ही योजना बहुमजली इमारतीतील फ्लॅट्सनांही लागू करायची तरतूद होती. त्यात इमारतीत जेवढे फ्लॅट्स आहेत त्या प्रत्येक फ्लॅटला 16 युनिट पाणी मोफत वजा करून बिल तयार करण्याची तरतूद होती. मात्र या इमारतीतील पाण्याचा वापर निर्धारित सवलत क्षमतेपेक्षा जास्त झाल्यास त्यांना संपूर्ण पाण्याचे बिल आहे त्या स्लॅबमध्ये भरायचे असे ठरले होते. जर एका सोसायटीत 20 फ्लॅट्स असले तर त्या सोसायटीला 320 युनिट पाणी मोफत मिळू शकेल; मात्र ही मर्यादा ओलांडून जर 321 युनिट पाणी वापरले गेले तर मात्र त्यांना सर्व 321 युनिट पाण्याचे बिल कुठल्याही सवलतीविना भरावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AI Wildlife Protection: वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी 'एआय'चा पहिला प्रयोग यशस्वी! जंगलातील प्रत्येक आवाजावर नजर; तस्करी आणि घुसखोरीला बसणार आळा

Goa Beach Shack: गोव्यातील शॅक व्यावसायिकांनो सावधान! विनापरवाना शॅक उभारल्यास तब्बल 20 लाखांचा दंड; साहित्य जप्त करण्याचीही तरतूद

Philippines Ship Accident: फिलीपिन्समध्ये समुद्रात जहाजाला भीषण आग; 5 जणांचा मृत्यू, 80 हून अधिक बेपत्ता Watch Video

Apple प्रेमींसाठी आनंदाची बातमी! iPhone 18 Pro, iPhone 18 Pro Max आणि iPhone Duo च्या किमती समोर; भारतात कधीपासून सुरू होणार विक्री?

'भावना कशा स्पष्ट करणार?' पुतळ्याच्या मुद्द्यावर गोवा सरकारची कोर्टात कानउघाडणी; याचिका मागे घेण्यासही खंडपीठाचा स्पष्ट नकार

SCROLL FOR NEXT