Goa Loksabha Election 2024 
गोवा

समोसा, बटाटावडा 15 रुपये तर चहा, कॉफी 12-18 रुपये; ECI कडून गोव्यात उमेदवारांसाठी खर्च मर्यादा लागू

Goa Loksabha Election 2024: निवडणूक आयोगाने उमेदवारांवर निवडणुकीतील विविध खर्चावर मर्यादा लागू केलीय. यात खाद्यपदार्थांवर किती रुपये खर्च करणे अपेक्षित आहे याचे दर देखील देण्यात आले आहेत.

Pramod Yadav

Goa Loksabha Election 2024

लोकसभेसाठी सध्या देशात मतदान सुरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान गेल्या १९ तारखेला पार पडले. येत्या काही दिवासांत पुढीत मतदान पार पडेल.

दरम्यान, उर्वरीत जागांसाठी सध्या प्रचार जोमात सुरु असून, विविध पक्ष उमेदवारांच्या प्रचारावर वारेमाप पैसे उधळत असताना, निवडणूक आयोगाने उमेदवारांवर निवडणुकीतील विविध खर्चावर मर्यादा लागू केलीय. यात खाद्यपदार्थांवर किती रुपये खर्च करणे अपेक्षित आहे याचे दर देखील देण्यात आले आहेत.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, उमेदवाराला एक समोसा किंवा बटाटावड्यासाठी जास्तीत 15 रुपये खर्च करता येतील. मिरची, भजी यासाठी 6-18 रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे. तर, चहा किंवा कॉफीसाठी 12-18 रुपये खर्च करता येतील. तसेच, शाकाहारी थाळीसाठी एका व्यक्तीवर 120 रुपये तर मांसाहारी थाळीसाठी 198 रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

आठराव्या लोकसभेसाठी गोव्यात येत्या 07 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चाची माहिती ठेवण्यासाठी खाद्यपदार्थांचे दर निश्चित केले आहेत. उमेदवारांनी केलेल्या सूचना विचारात घेतल्यानंतर आयोगाने 29 खाद्यपदार्थांचे दर निश्चित करण्यात आले आहेत.

कडक उन्हाळ्याचा विचार करता मोर्चे आणि सभांमध्ये शीतपयांचे वाटप देखील केले जाणार याचा विचार करून, शीतपेयांसाठीचा खर्च 12 ते 18 रुपये निश्चित करण्यात आला आहे.

आयोगाने बहुतांश राज्यात सर्वाधिक खर्चाची मर्यादा 95 लाख एवढी निश्चित केली असताना गोव्यासाठी ती 75 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. उमेदवारांना ठरलेल्या मर्यादेतच खर्च करावा लागणार असून, त्याचा अहवाल आयोगाकडे जमा करावा लागेल.

खर्चात जाहीर सभा, मोर्चे, जाहीरात, होर्डिंग, पत्रके आणि प्रचार साहित्यांचा समावेश आहे. 40 इंची टीव्हीसाठी प्रतिदिवस 480 रुपये भाडे मोजावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT