Goa Employment | IPB meeting  Google image
गोवा

Employment in Goa: फाईव्हस्टार हॉटेल, कॉलेज, अन्न प्रक्रिया उद्योग अशा 3 प्रकल्पांना मंजुरी; 1338 जणांना मिळणार रोजगार

राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची मान्यता; एकूण 165 कोटींची होणार गुंतवणूक

Akshay Nirmale

Goa Government Employment: राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (IPB) तीन प्रकल्पांना मंजुरी दिली असून त्यातून राज्यात 1338 जणांना रोजगार मिळणार आहे.

मंडळाच्या 34 व्या बैठकीत याबाबत निर्णय झाले. बैठकीच्या अध्यस्थानी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत होते.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, मंडळाने गर्व्हमेंट टू बिझनेस सर्व्हिसेस साठी ऑनलाईन पद्धतीने एक खिडकी तसेच कॉमन अॅप्लिकेशन फॉर्म तयार करण्याबाबत चर्चा केली.

या बैठकीला उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, जीआयडीसीचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड, मंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते.

असे आहेत तीन प्रकल्प

1) या तीन प्रोजेक्टमध्ये वर्ल्डवाईड रिसॉर्ट अँड एंटरटेन्मेंट प्रा. लि. द्वारे बांबोळीत फाईव्हस्टार हॉटेल होणार आहे. येथे एकूण 887 जणांना रोजगार मिळणार असून या प्रकल्पात 132 कोटी रूपये गुंतवणूक होणार आहे.

2) पेलिन्ड्रोम एंटरप्राईझेस तर्फे अन्न प्रक्रिया उद्योग उभारला जाणार आहे. जीआयडीसीने त्यासाठी जमिन दिली आहे. यात खाद्यपदार्थ, डिहायड्रेटेड अंड्यांपासून बनवलेले वेफर्स, चिकन, मटण, मासे, कोळंबी आणि पोर्क यापासून येथे पदार्थ बनवले जाणार आहेत.

या प्रकल्पात 371 जणांना रोजगार मिळणार असून एकूण 5 कोटींची गुंतवणूक असणार आहे.

3) याशिवाय सातेरी पिसानी एज्युकेशन सोसायटीतर्फे धारबांदोडा तालुक्यात एक महाविद्यालय उभारले जाणार आहे. येथे बीबीए, बी.कॉम, बीसीए हे अभ्यासक्रम असणार आहेत. येथे 80 जणांना रोजगार मिळणार आहे तर 28 कोटी रूपये गुंतवणूक या प्रकल्पात होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT