Goa Education Department  Dainik Gomantak
गोवा

Goa Education Department : शिक्षण खात्यातील भरतीचा वर्षाला 12.74 कोटींचा भार

कारकून भरती प्रक्रियेस येत्या 30 पासून होणार प्रारंभ

दैनिक गोमन्तक

शिक्षण खात्यातील कारकून पदाच्या 70 आणि राज्यातील सरकारी प्राथमिक शाळांसाठी 142 शिक्षक भरती लवकरच होणार आहे. त्यासाठी या पदांच्या परीक्षाही झाल्या आहेत. परंतु ही सर्व पदे भरल्यानंतर या सर्वांच्या पगारापोटी १२.७४ लाख रुपयांच्या खर्चाचा सरकारी तिजोरीवर भार पडणार आहे, असे प्रथम दर्शनी दिसून येते.

कारकून पदासाठी साधारण ३० हजार रुपये, तर प्राथमिक शिक्षकासाठी ५० हजार रुपये मासिक वेतन पकडले तर कारकूनांच्या वेतनावर महिन्याकाठी २१ लाख, तर शिक्षकांच्या वेतनावर महिन्याकाठी ८५ लाख २० हजार रुपये खर्च होणार आहे.

वर्षाकाठी या पदांवरील वेतनापोटी सरकारच्या तिजोरीतून १२ कोटी ७४ लाख ४० हजार रुपये खर्च होणार आहेत. त्याशिवाय खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दर महिन्याकाठी एक-दोन कारकून, तसेच शिक्षक सेवानिवृत्त होत असतो. त्यामुळे ही रिक्त होणारी पदेही यापुढे भरावयाची झाल्यास कर्मचारी निवड आयोगातर्फे केली जाणार आहे.

कारकून पदासाठी पात्र ठरलेल्यांची ३० जूनपासून पुढील आवश्‍यक त्या चाचण्या होणार आहेत. शिक्षकांच्या परीक्षा झाल्या असल्या तरी त्यांची अंतिम यादी खात्याकडे आलेली नाही, त्यामुळे १४२ पदांची निवड पुढील महिन्यावर जाणार हे स्पष्ट आहे.

..अहवाल बाकी!

२०२३-२४ चा सरकारी प्राथमिक शाळांचा अहवाल अद्यापि आलेला नाही. त्यानंतरच कोणत्या शाळांमध्ये किती विद्यार्थी संख्या आहे, हे स्पष्ट होईल. कोणत्या शाळा विलीन होण्यास इच्छुक आहेत, हे दिसून येईल.

भाषेचा विचार केला तर मुरगावातील दोन कन्नड शाळा हिंदी माध्यमाच्या शाळांमध्ये विलीन झाल्या आहेत आणि डिचोलीतील पालकांच्या समंतीवरून दोन शाळांचे विलीन झाले आहे, असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT