Loksabha Election Goa 2024 Dainik Gomantak
गोवा

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

Goa News: अन्याय रहित जिंदगी (ARZ) च्या माध्यमातून वेश्याव्यवसायिक महिलांना मतदानाचा अधिकार मिळण्यास मदत झालीय.

Pramod Yadav

Goa News

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मुरगाव तालुक्यातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या 12 महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. 27 अर्जदारांपैकी, 12 महिलांना मतदार यादीत स्थान मिळाले आहे.

अन्याय रहित जिंदगी (ARZ) च्या कायदेशीर सल्लागार, अश्लेषा तांडेल यांच्या सहकार्यातून महिलांना मतदानाचा अधिकार मिळण्यास मदत झालीय. तांडेल यांनी या महिलांना अर्ज दाखल करण्यासह कागदपत्र खरेदी करण्यात मदत केली.

ARZ चे संस्थापक अरुण पांडे यांनी वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना कागदपत्रे सादर करण्यात येणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकला. निवडणूक आयोग (ECI) आणि केंद्र सरकारकडून अशा महिलांना कागपत्रांबाबत सवलत मिळावी, असे आवाहन यावेळी केले.

मतदार यादीत समाविष्ट होऊ न शकलेल्या 15 महिलांना कागदपत्रांसंबधित विविध समस्यांचा सामना करावा लागला. मतदानाचा हक्क नाकारणे म्हणजे एखाद्याची प्रतिष्ठा नाकारण्यासारखे आहे, असे पांडे म्हणाले.

12 सेक्स वर्कर्समध्ये, पाच प्रथम मतदार असून, सात महिलांना बायणा येथे त्यांच्या झोपड्या पाडल्यानंतर नोंदणी समस्यांना सामोरे जावे लागले.

वेश्याव्यवसायातील महिलांना मतदानाबाबत जागृत करणे हा ARZ द्वारे आयोजित शैक्षणिक शिबिराचा उद्देश होता. मतदानाच्या हक्कामुळे वेश्याव्यवसायिकांना सरकारी योजनांचा लाभ घेता येऊ शकतो, असे यावेळी नमूद करण्यात आले.

यापूर्वी, 2022 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान ARZ च्या माध्यामातून 40 वेश्याव्यवसायातील महिला आणि 28 ट्रान्सजेंडर व्यक्तींची मतदार नोंदणी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KitKat Chocolate Theft: चोरट्यांना 'किटकॅट'ची चटक! 12 टन पळवले चॉकलेट, नेस्ले प्रवक्त्याच्या 'त्या' विधानाची होतेय चर्चा

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

US Iran War: "इराण गुडघ्यावर आलाय!" डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 15 कलमी शांतता योजनेवर लवकरच होणार स्वाक्षरी? VIDEO

VIDEO: बागा बीचवर मृत्यूशी थरार! पॅरासिलिंग सुरु असताना अचानक दोरी तुटली अन्... पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT