Goa arrest Dainik gomantak
गोवा

Goa Crime: वार्का परिसरात पोलिसांची मोठी कारवाई! सार्वजनिक शांतता भंग केल्‍याबद्दल १२ जण ताब्‍यात

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: वार्का किनारपट्टी परिसरात रात्रीच्‍यावेळी गोंधळ घालून सार्वजनिक शांतता भंग केल्‍याच्‍या आरोपावरून कोलवा पोलिसांनी काल रात्री १२ जणांना ताब्‍यात घेतले. हे बाराहीजण एका कामासाठी कंत्राटदाराने आणले होते आणि त्‍यांना एका ठिकाणी ठेवले होते.

काल रात्री या कामगारांमध्‍ये भांडण होऊन त्‍यांनी गोंधळ घालण्‍यास सुरवात केल्‍याने शेजाऱ्यांनी केलेल्‍या तक्रारीच्‍या आधारे त्‍यांना ताब्‍यात घेतले. त्‍याशिवाय आणखी २२ जणांना बेकायदेशीररीत्‍या वास्‍तव्य करून राहत असल्‍यामुळे पोलिसांनी ताब्‍यात घेतल्‍याची माहिती कोलवाचे पोलिस निरीक्षक सतीश पडवळकर यांनी दिली.

त्‍यापूर्वी १२ ऑगस्‍ट रोजी कोलवा किनाऱ्यावर फिरून पर्यटकांना आमिषे दाखविणारी पॅम्‍पलेट्‌स वाटल्‍याच्‍या आरोपाखाली कोलवा पोलिसांनी पाच दलालांना अटक केली हाेती. हे दलाल कोलवा किनाऱ्यावर पर्यटकांना जाहिरात पॅम्प्लेट्‌सचे वाटप करत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cutbona Jetty: 'मतदारसंघात आम्हालाच बोलावले जात नाही!' कुटबणबाबत क्रुझ सिल्वांचा हल्लाबोल

Goa BJP: 'पक्ष व सरकार यांच्यात समन्वय पाहिजेच'; गोवा भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची तंबी

रस्त्यांचा सुमार दर्जाच कारणीभूत! अधिकाऱ्यांबरोबर कंत्राटदारही जबाबदार; आमदार लोबो

खरी कुजबुज: रवींचे ‘एका दगडात दोन पक्षी’

Goa Crime: व्‍हिडिओ व्‍हायरल करण्‍याची धमकी देणाऱ्या तरुणास अटक; असाहाय्य माय-लेकींवर अत्‍याचार

SCROLL FOR NEXT