Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: दिवसभरात राज्यात 117 नवे कोरोना रूग्ण, सक्रिय रूग्णसंख्येत होतेय वाढ

नवीन कोरोना रूग्णांपैकी 8 रूग्णांना रूग्णालयात दाखल केले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Corona Update गोव्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वेगाने वाढ होत चालली आहे. त्यातच राज्यासाठी धक्कादायक अशी एक बातमी आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 4013 वर स्थिर राहिली होती.

तथापि, राज्यात दोन दिवसांपूर्वी एका कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना मृत्युंची संख्या 4014 झाली आहे.

कोरोना तपासण्यांची संख्या जसजशी वाढेल तसतशी नवीन कोरोना रूग्णसंख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात गोव्यात एकूण 117 नवे कोरोना रूग्ण आढळून आले.

या नव्या रूग्णांमुळे राज्यातील सक्रीय म्हणजे उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णांच्या संख्येचा आकडा आता पाचशेचा टप्पा ओलांडून 601 वर पोहचला आहे.

गेल्या 24 तासांत राज्यात आढळलेल्या 117 नवीन कोरोना रूग्णांपैकी 8 रूग्णांना रूग्णालयात दाखल केले आहे तर उर्वरीत 109 बाधितांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

गेल्या 24 तासांमध्ये एकूण 34 रूग्ण कोरोनामुक्त झाले तर एकूण 969 चाचण्या करण्यात आल्या. राज्यात कोरोनामुक्तीचा दर 98.23 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे एक मृत्यू झालेला नाही.

राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे 4014 मृत्यू झाले आहेत. राज्यात एकूण 21 लाख 63 हजार 034 चाचण्या झाल्या आहेत. तर एकूण 2 लाख 60 हजार 050 कोरोनारूग्ण आढळून आले होते. त्यापैकी 2 लाख 55 हजार 435 रूग्ण बरे झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa PWD Workers Regularisation: 1,399 ‘PWD’ कामगारांना हायकोर्टचा मोठा दिलासा; 9 फेब्रुवारी 2021 पासून सेवेत, वरिष्ठता आणि निवृत्तीवेतनाचे सर्व लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

Goa Shipyard Jaigad Project: जयगडकडे 660 एकरवर अत्याधुनिक जहाजबांधणी प्रकल्प; वास्कोत अडथळे, गोवा शिपयार्डचा मोर्चा, जर्मन कंपनीकडे सल्लागाराची धुरा

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

SCROLL FOR NEXT