Bicholim Goa | pepper spray  
गोवा

Bicholim: अकरावीच्या वर्गात मुलांनी मारला स्प्रे, 11 विद्यार्थिनींना श्वासोच्छवासाचा त्रास; पोलिसांसमोर पेच

घटना नेमकी कशामुळे घडली याचे कारण समोर आले असून, यातील सहभागी संशयितांमुळे पोलिसांसमोर पेच निर्माण झाला आहे.

Pramod Yadav

डिचोली तालुक्यातील एका माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शाळेत दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला. ज्युनियर कॉलेजच्या अकरावी कला शाखेच्या वर्गातील 11 मुलींना अचानक श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागला.

अकरा मुलींना रूग्णालयात दाखल करण्यात आले, सात मुलींना उपचारानंतर आता बरे वाटत असून उर्वरीत 4 मुलींना म्हापसा जिल्हा रूग्णालयात हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान, ही घटना नेमकी कशामुळे घडली याचे कारण समोर आले असून, यातील सहभागी संशयितांमुळे पोलिसांसमोर पेच निर्माण झाला आहे.

वर्गातील मुलांनी मारला स्प्रे

मुलांनीच वर्गात पेपर स्प्रे मारल्याची तपासात समोर आले असून, त्या चार विद्यार्थ्यांची ओळख पटली आहे. संशयित अल्पवयीन असल्याने पोलिसांना कारवाईत अडथळा येत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांवर विद्यालयाच्या वतीने योग्य ती कारवाई करून त्यांना निलंबित करावे असे पत्र पोलिसांनी कॉलेज प्रशासनाला लिहले आहे.

त्यामुळे काॅलेज प्रशासन या विद्यार्थ्यांवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वीही घडला होता असा प्रकार

याच शाळेत आठ दिवसांपुर्वी अशा प्रकारची घटना घडली होती. यावेळी दोन विद्यार्थिनींना त्रास झाला होता. याप्रकरणी एका विद्यार्थ्यांला निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, कालपासूनच तो विद्यार्थी पुन्हा शाळेत येऊ लागला होता, असेही सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT