Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: गोवा पोलीस खात्यात बदल्यांचा आदेश! 11 उपअधीक्षकांची यादी; 4 जणांकडे अतिरिक्त ताबा

Goa Police Transfer: पोलिस खात्यातील ११ उपअधीक्षकांच्या बदल्यांचा तर ४ उपअधीक्षकांकडे अतिरिक्त ताबा देण्याचा आदेश आज काढण्यात आला. फोंडा उपविभागीय पोलिस अधिकारीपदी शिवराम वायंगणकर यांची तर डिचोली उपविभागीय पोलिस अधिकारीपदी जिवबा दळवी यांची बदली झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Police Transfer Orders

पणजी: पोलिस खात्यातील ११ उपअधीक्षकांच्या बदल्यांचा तर ४ उपअधीक्षकांकडे अतिरिक्त ताबा देण्याचा आदेश आज काढण्यात आला. फोंडा उपविभागीय पोलिस अधिकारीपदी शिवराम वायंगणकर यांची तर डिचोली उपविभागीय पोलिस अधिकारीपदी जिवबा दळवी यांची बदली झाली आहे.

कोकण रेल्वेचे उपअधीक्षक गुरुदास कदम यांची वास्को उपविभागीय पोलिस अधिकारीपदी तर त्यांच्या जागी केपेचे उपअधीक्षक नीलेश राणे यांची वर्णी लावण्यात आली आहे. किनारपट्टी सुरक्षा उपअधीक्षक सुदेश नार्वेकर यांची उत्तर गोवा वाहतूक पोलिस उपअधीक्षकपदी तर त्यांच्या जागी वास्कोचे उपअधीक्षक शेख सलीम यांची बदली झाली आहे.

उत्तर गोवा वाहतूक पोलिस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांची मडगाव उपअधीक्षकपदी, डिचोलीचे उपअधीक्षक सागर एकोस्कर यांची केपेचे उपअधीक्षक, सायबर क्राईम उपअधीक्षक आशिष शिरोडकर यांची पेडण्याचे उपअधीक्षक, दक्षिण गोवा मुख्यालय उपअधीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांची दक्षिण गोवा वाहतूक उपअधीक्षकपदी, आयआरबीचे उपअधीक्षक अमित बोरकर यांची गोवा राखीव पोलिस दलात बदली करण्यात आली आहे.

दक्षिण गोवा विशेष शाखा उपअधीक्षक रूपेश शेटगावकर यांच्याकडे एटीएस उपअधीक्षकपदाचा, तिसऱ्या आयआरबीचे उपअधीक्षक नरेश मंगडकर यांच्याकडे एटीएस उपअधीक्षकपदाचा, क्राईम ब्रँचचे उपअधीक्षक सूरज हळर्णकर यांच्याकडे सायबर क्राईम उपअधीक्षकपदाचा तर मोटार वाहन विभागाचे उपअधीक्षक विल्सन डिसोझा यांच्याकडे पणजी मुख्यालय उपअधीक्षकपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT