Financial Fraud News From Noida Dainik Gomantak
गोवा

Goa Fraud News : टॅक्सी कराराच्या बहाण्याने 10.55 लाखांना चुना

दोघांवर गुन्हा दाखल : आयएएस अधिकाऱ्याचा ‘पीए’ असल्याचा केला बनाव

दैनिक गोमन्तक डिजिटल

राज्यात मोठमोठे नेते, अधिकारी यांची नावे सांगून लोकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. शनिवारी उसगावातील एका स्थानिकाला आयएएस अधिकाऱ्याचा पीए असल्याचे सांगून तब्बल 10.55 लाख रुपयांना गंडा घातल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

आपण राज्यातील आयएएस अधिकाऱ्याचा पीए असून एका तारांकित हॉटेलमध्ये टॅक्सी सेवेचे कंत्राट देण्याच्या बहाण्याने उसगाव येथील रहिवासी पार्सोल यांच्याकडून समीर धावसकर आणि दिनकर सावंत या दोघांनी 10.55 लाख रुपये घेतले. याहून मोठे कंत्राट हवे असल्यास त्यासाठी आणखी मोठी रक्कम द्यावी लागेल, असे पार्सोल यांना सांगण्यात आले होते.

सर्व पैसे दिल्यानंतर एक आठवड्यानंतर हे काम होईल, असे पार्सोल यांना सांगितले होते. मात्र, पैसे देऊन दोन आठवडे झाले, तरी हे काम न झाल्याने पार्सोल यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. याप्रकरणी समीर धावसकर आणि दिनकर सावंत यांच्याविरोधात त्यांनी पणजी पोलिसांनी तक्रार नोंदविली आहे.

याप्रकरणी या दोन्ही संशयित धावसकर आणि सावंत यांच्या विरोधात पणजी पोलिसांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

‘तो’ अधिकारीही रडारवर

या प्रकरणातील संशयित कोणत्या आयएएस अधिकाऱ्यासाठी काम करतात, हे पोलिसांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र, दोन्ही संशयितांची ओळख पटली असून तो अधिकारीही पोलिसांच्या रडारवर आहे. लवकरच संशयितांच्या मुसक्या आवळल्या जातील, असे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT