Shramdham Yojana Ramesh Tawadkar Dainik Gomantak
गोवा

Shramdham Yojana: ‘श्रमधाम’मधून 100 घरे बांधणार! तवडकरांची घोषणा; 10 हजार कार्यकर्ते जोडणार

Ramesh Tawadkar: बलराम चॅरिटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून ‘श्रमधाम’ संकल्पनेतून बांधलेल्या ३० घरांच्या चाव्या लाभार्थ्यांना देण्याचा कार्यक्रम कला अकादमीचा सभागृहात झाला.

Sameer Panditrao

पणजी: येत्या वर्षभरात श्रमधाम संकल्पनेतून १०० घरांची बांधणी राज्यभरात केली जाईल. प्रत्येक घरामागे १०० या प्रमाणे १० हजार ‘श्रमधाम’ योद्ध्यांना जोडण्यात येईल, अशी घोषणा मंत्री रमेश तवडकर यांनी आज येथे केली.

बलराम चॅरिटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून ‘श्रमधाम’ संकल्पनेतून बांधलेल्या ३० घरांच्या चाव्या लाभार्थ्यांना देण्याचा कार्यक्रम कला अकादमीचा सभागृहात झाला.

त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रीय आदिवासी कल्याण राज्यमंत्री दुर्गादास उईके, आमदार दाजी साळकर, प्रेमेंद्र शेट, माजी आमदार दयानंद सोपटे, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष धाकू मडकईकर, भाजपचे दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष प्रभाकर गावकर, कला अकादमीचे सदस्य सचिव शंकर गावकर व पैंगीणच्या सरपंच सविता तवडकर होत्या. तवडकर म्हणाले, पुढेमागे राज्याचे मुख्य सचिवही ‘श्रमधाम योद्धा’ म्हणून वावरताना दिसतील.

मदत करणाऱ्यांचा सत्कार

यावेळी घर बांधण्यासाठी मदत केलेल्या केशव प्रभू, प्रशांत पागी, संजय सातार्डेकर, संगम कुराडे, नवल नाईक, रवींद्र रुणावत यांचा गौरव करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT