Betel Nut Dainik Gomantak
गोवा

सुपारी गळतीमुळे होते वार्षिक 10 टक्के नुकसान; रोगप्रतिबंधक औषध फवारण्या केल्या तरी फरक नाही

सावईकर : औषध फवारणीसाठी कर्नाटकमधील कामगार

दैनिक गोमन्तक

रोगप्रतिबंधक औषध फवारण्या केल्या तरी पावसाळ्यात सुपारीची गळती होत असते. या गळतीमुळे वार्षिक साधारणपणे १० टक्के नुकसान सहन करावे लागते, असे मत मुरगे-साकोर्डा येथील कृषी भूषण पुरस्कार प्राप्त श्रीपती सावईकर यांनी व्यक्त केले.

सुपारीवर औषध फवारणी करण्यासाठी शिर्सी-कर्नाटक येथील दोन कामगारांना प्रत्येक वर्षी बोलावून पावसाळ्यात दोनवेळा फवारण्या करण्यात येत असतात. पहिल्या फवारणीनंतर साधारण दीड महिन्यानंतर चुना, मोर्चूत मिश्रणाने सुपारीवर फवारणी करून घ्यावी लागते. त्यामुळे पावसाळ्यात सुपारी गळण्याचे प्रमाण कमी असते.

मात्र, मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली तर सुपारी गळण्याचे प्रमाण साधारण १० टक्के एवढे असते. यावर्षी उष्णतेत प्रचंड वाढ झाल्याने बारीक सुपारी गळायला लागल्याने साधारणपणे २५ टक्के नुकसान झाले आहे. यापूर्वी अशी कधीही सुपारीची गळती झाली नव्हती, असे सावईकर यांनी सांगितले.

नुकसान भरपाई होईल

शेडमध्ये प्रचंड उष्णतेची निर्मिती होत असल्याने सुकवण्यासाठी ठेवलेल्या ओल्या सुपारीची उष्णतेमुळे वाफ निर्माण होऊन ती सिलपोलिनच्या खालच्या बाजूला अडकते. पावसाळ्यात सुपारी गळतीमुळे सावईकर यांना वर्षाला साधारण ३ लाख रुपये नुकसान सोसावे लागत होते. या शेडमुळे नुकसान भरून काढण्यात येईल .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT