Shubhman Gill, Arjun Tendulkar Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Vijay Hazare Trophy: शुभमन गिल, तेंडुलकरचा फ्लॉप शो! गोव्याचा सलग 3 रा पराभव; पंजाबची पाचव्या विजयाची नोंद

Goa Vs Punjab: अपेक्षेनुसार पंजाबचा संघ खूपच बलाढ्य ठरल्यामुळे गोव्याला विजय हजारे करंडक लिस्ट ए (एकदिवसीय) क्रिकेट स्पर्धेत ओळीने तिसरा पराभव पत्करावा लागला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: अपेक्षेनुसार पंजाबचा संघ खूपच बलाढ्य ठरल्यामुळे गोव्याला विजय हजारे करंडक लिस्ट ए (एकदिवसीय) क्रिकेट स्पर्धेत ओळीने तिसरा पराभव पत्करावा लागला. एलिट क गट सामना मंगळवारी जयपूर येथील के. एल. सैनी स्टेडियमवर झाला. दरम्‍यान, जयपूर येथे हिमाचल प्रदेशविरुद्धच्‍या सामन्‍यात मुंबईने कसाबसा ७ धावांनी विजय मिळवून उपांत्‍यपूर्व फेरीत प्रवेश केला. प्रदीर्घ कालावधीनंतर परतलेल्‍या श्रेयस अय्‍यरने ८२ धावांची स्‍फोटक खेळी करताना १० चौकार आणि ३ षटकार ठोकले.

पंजाबने २१२ धावांचे आव्हान ३५ षटकांत चार विकेट गमावून पार केले. सामना सहा विकेटने जिंकून पंजाबने स्पर्धेतील पाचव्या विजयाची नोंद केली. सकाळी उशिरा सुरू झालेला सामना प्रत्येकी ४० षटकांचा करण्यात आला.

भारताच्या कसोटी व एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिल फक्त ११ धावांवर बाद झाला. त्याला वासुकी कौशिक याने सुयश प्रभुदेसाई याच्याकरवी झेलबाद केले. मात्र हरनूर सिंग (नाबाद ९४, ९० चेंडू, ११ चौकार व १ षटकार) व नमन धीर (६८, ६५ चेंडू, ६ चौकार, ३ षटकार) यांनी चौथ्या विकेटसाठी १३१ धावांची भागीदारी करून पंजाबला सोपा विजय मिळवून दिला.

त्यापूर्वी, प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर गोव्याचा डाव ३३.३ षटकांत २११ धावांत संपुष्टात आला. सुयश प्रभुदेसाई (६६) व ललित यादव (५४) यांनी अर्धशतके ठोकली.

संक्षिप्त धावफलक

गोवा : ३३.३ षटकांत सर्वबाद २११ (अर्जुन तेंडुलकर १, कश्यप बखले ५, स्नेहल कवठणकर १६, सुयश प्रभुदेसाई ६६, ललित यादव ५४, अभिनव तेजराणा ६, दीपराज गावकर ५, विकास सिंग १२, राजशेखर हरिकांत नाबाद २०, वासुकी कौशिक ०, शुभम तारी ०, अर्शदीप सिंग २-२६, सुखदीप बाजवा २-३२, क्रिश भगत २-३३, मयंक मार्कंडे ३-२९) पराभूत वि. पंजाब : ३५ षटकांत ४ बाद २१२ (प्रभसिमरन सिंग २, शुभमन गिल ११, हरनूर सिंग नाबाद ९४, अनमोलप्रीत सिंग १७, नमन धीर ६८, रमणदीप सिंग नाबाद १५, वासुकी कौशिक ८-०-२२-२, अर्जुन तेंडुलकर ६-०-४८-०, शुभम तारी ६-०-४९-१, ललित यादव ५-०-३४-१, दीपराज गावकर ६-०-२३-०, विकास सिंग ४-०-३४-०).

अर्जुन तेंडुलकर पुन्हा विकेटविना

गोव्याचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर याची गोलंदाजी सलग पाचव्या सामन्यात महागडी ठरली. त्याने स्पर्धेत अजूनपर्यंत एकही गडी बाद केलेला नाही. पंजाबविरुद्ध त्याने सहा षटकांत ४८ धावा मोजल्या. तसेच फलंदाजीतही तो अपयशी ठरला. सलामीला येत फक्त एक धाव करून बाद झाला.

पंजाब, मुंबईचे स्थान भक्कम

स्पर्धेच्या एलिट क गटातील एक फेरी बाकी असताना प्रत्येकी पाच विजय नोंदवून समान २० गुणांसह पंजाब व मुंबईने बाद फेरीतील प्रवेश निश्चित केला. महाराष्ट्र, छत्तीसगड, गोवा व उत्तराखंडचे प्रत्येकी १२ गुण, तर हिमाचल प्रदेशचे आठ गुण झाले आहेत. सिक्कीमला सर्व सहाही सामन्यांत पराभव पत्करावा लागला. गोवा आणि महाराष्ट्र यांच्यात होणारी अखेरची लढत आता औपचारिकता असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New Borim Bridge: नवीन बोरी पुलासाठी 1000 कोटींचा आराखडा! अडीच वर्षांत काम होणार पूर्ण; ढवळीतून निघणार बगलरस्ता

Goa Crime: टॉवेल आणण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार; 75 वर्षीय गुन्हेगाराला सश्रम कारावासाची शिक्षा

धक्कादायक! आरोपीने तुरुंगातून तक्रारदाराला लावला फोन; जेलमधील मोबाईल, ड्रग्जवरून हायकोर्ट संतप्त; दिले महत्वाचे निर्देश

Agonda Beach: आगोंद ‘कासव संवर्धन’ क्षेत्रात बेकायदा बांधकामांची रेलचेल! न्‍यायालय संतप्‍त; दिले चौकशीचे आदेश

Kala Academy: कला अकादमीच्या नूतनीकरणात '50 कोटी' वायफळ खर्च! टास्क फोर्सकडून गंभीर चिंता व्यक्त; IIT मद्रासच्या अहवालातून त्रुटी उघड

SCROLL FOR NEXT