Vijay Hazare Trophy Goa Vs Assam Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Vijay Hazare Trophy: गोवा संघाचा नववर्ष पूर्वसंध्येला जल्लोष! अटीतटीच्या सामन्यात आसामला नमवले; ईशानचे शानदार अर्धशतक

Goa Vs Assam: ७ बाद १३८ धावांवरून अखेरच्या तीन षटकांत तळाच्या फलंदाजांनी फटकेबाजी केल्यामुळे आसामला पराभवाचे अंतर कमी करता आले.

Sameer Panditrao

Vijay Hazare Trophy Goa Vs Assam

पणजी: गोव्याच्या सीनियर क्रिकेट संघाने मंगळवारी जयपूर येथे नववर्षाच्या पूर्वसंध्येला जल्लोष केला. विजय हजारे करंडक लिस्ट ए (एकदिवसीय) क्रिकेट स्पर्धेत तिसरा सामना जिंकताना त्यांनी आसामला नऊ धावांनी नमविले.

जयपूरमधील दाट धुके आणि दव यामुळे अ गटातील सामना मंगळवारी उशिरा सुरू झाला. प्रत्येकी ३० षटकांचा सामना जयपुरिया विद्यालय मैदानावर झाला. या लढतीत गोव्याने प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर सलामीच्या ईशान गडेकर याच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर सर्वबाद १८२ धावा केल्या.

ईशानने स्पर्धेतील तिसऱ्या अर्धशतकाची नोंद करताना ४९ चेंडूंत सात चौकार व एका षटकारासह ५५ धावा केल्या. त्याने स्नेहल कवठणकर (१९) याच्यासमवेत संघाला ५६ धावांची सलामी दिली. याशिवाय के. व्ही. सिद्धार्थने ३५, तर विकास सिंगने २२ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.

गोव्याच्या नियोजनबद्ध गोलंदाजीसमोर आसामला निर्धारित ३० षटकांत ८ बाद १७३ धावा करता आल्या. ७ बाद १३८ धावांवरून अखेरच्या तीन षटकांत तळाच्या फलंदाजांनी फटकेबाजी केल्यामुळे आसामला पराभवाचे अंतर कमी करता आले. पाच लढतीतील तीन विजय व दोन पराभवामुळे गोव्याचे आता १२ गुण झाले आहेत. आसामला पाच लढतीत चौथा पराभव पत्करावा लागला. अ गट साखळीत गोव्याचे आणखी दोन सामने बाकी असून ते अनुक्रमे गुजरात व झारखंडविरुद्ध खेळतील.

संक्षिप्त धावफलक

गोवा : २९.२ षटकांत सर्वबाद १८२ (ईशान गडेकर ५५, स्नेहल कवठणकर १९, के. व्ही. सिद्धार्थ ३५, दर्शन मिसाळ ३, सुयश प्रभुदेसाई १५, विकास सिंग २२, दीपराज गावकर १४, मोहित रेडकर ६, फेलिक्स आलेमाव २, अमूल्य पांड्रेकर २, शुभम तारी नाबाद ०, मुख्तार हुसेन ५.२-०-२२-३, अविनव चौधुरी ६-०-२८-४) वि. वि. आसाम : ३० षटकांत ८ बाद १७३ (सुमीत घाडीगावकर ५०, देनिश दास २८, साहिल जैन २२, आकाश सेनगुप्ता नाबाद २३, शुभम तारी ६-०-४६-१, मोहित रेडकर ३-०-१२-२, फेलिक्स आलेमाव ६-०-२९-२, दर्शन मिसाळ ६-०-२८-१, दीपराज गावकर ४-०-२४-१, अमूल्य पांड्रेकर ५-०-२५-१).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT