Goa Chess Mandar Lad Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Chess: अखिल गोवा राज्य बुद्धिबळ स्पर्धेत मंदार विजेता; शानदार अपराजित कामगिरी

Goa State Level Chess Competition: पराजित कामगिरीसह अखिल गोवा राज्य पातळीवरील सीनियर खुल्या राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत विजेतेपद

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: अपराजित कामगिरीसह मंदार लाड याने अखिल गोवा राज्य पातळीवरील सीनियर खुल्या राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत विजेतेपद पटकावले. त्याने नऊ फेऱ्यांतून सर्वाधिक साडेआठ गुणांची कमाई केली. स्पर्धा मडगाव येथे झाली.

स्पर्धेत अव्वल मानांकन असलेल्या मंदारने अखेरच्या फेरीत आयुष शिरोडकर याच्यावर नोंदवून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. त्याने स्पर्धेत एकूण आठ विजय व एका बरोबरीची नोंद केली. ११ वर्षांखालील वयोगटातील आर्यव्रत नाईक देसाई याने स्पर्धेत शानदार खेळ करताना साडेसात गुणांसह उपविजेतेपद मिळविले. काणकोणच्या या खेळाडूने स्पर्धेत अपराजित राहताना सहा विजय व तीन बरोबरीची नोंद केली.

देवेश नाईक व शुभ बोरकर यांचे समान सात गुण झाले. टायब्रेकर गुणांनंतर देवेश तिसऱ्या, तर शुभ चौथ्या स्थानी राहिला. ऋषिकेश परब, गुंजल चोपडेकर, आयुष शिरोडकर, विभव केरकर, अर्विन आल्बुकर्क, एड्रिक वाझ यांनी अनुक्रमे पाचवा ते दहावा क्रमांक मिळविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sexual Assault Case: तरुण तेजपालला मोठा झटका! लैंगिक शोषण प्रकरणात हायकोर्टानं ठरवलं दोषी

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! DA मध्ये 3 ते 4% वाढीचे संकेत, अधिकृत घोषणा कधी होणार? मोठी अपडेट समोर

Goa Congress Crisis: गोव्यात काँग्रेसला पर्याय शोधत विरोधकांची तिसरी आघाडी तयार? BJP विरोधात नवे प्रादेशिक पक्ष सज्ज

Brock Lesnar Retirement: 10 वेळचा WWE वर्ल्ड चॅम्पियन ब्रॉक लेसनर निवृत्त; म्हणाला, 'योग्य वेळी थांबण्याचा निर्णय...'

Goa Politics: भाजपने गोव्याला केले ‘नशायुक्त’ राज्य; भाजप सरकारवर काँग्रेसचा घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT