Goa Ranji Cricket Team  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Ranji Cricket: गोवा क्रिकेटबद्दल मोठी बातमी! रणजीसाठी निवडला नवीन Captain; 'या' कारणास्तव मुकणार पहिल्याच सामन्याला

Goa Ranji Team Captain: दर्शन मिसाळने सलग तीन मोसम गोव्याच्या रणजी क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषविल्यानंतर आता गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) नेतृत्वबदल केला आहे.

पणजी: डावखुरा अष्टपैलू दर्शन मिसाळने सलग तीन मोसम गोव्याच्या रणजी क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषविल्यानंतर आता गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) नेतृत्वबदल केला आहे.

हुकमी फलंदाज स्नेहल कवठणकर संघाचा नवा ‘नेता’ असेल, पण वैयक्तिक कारणास्तव त्याने ‘रजा’ घेतल्यामुळे अष्टपैलू दीपराज गावकर १५ पासून पर्वरी येथे खेळल्या जाणाऱ्या चंडीगडविरुद्धच्या एलिट ब गट चार दिवसीय लढतीत जबाबदारी सांभाळेल, असे संघटनेतर्फे सांगण्यात आले. या लढतीस स्नेहल व कर्नाटकी ‘पाहुणा’ वेगवान गोलंदाज वासुकी कौशिक अनुपलब्ध आहेत.

त्यांना अतिशय महत्त्वाच्या वैयक्तिक कारणास्तव जीसीएकडून पहिल्या सामन्यासाठी ‘रजा’ मंजूर करण्यात आली आहे. दुसऱ्या सामन्यापासून स्नेहलकडे कर्णधारपदाची धुरा असेल. दिल्लीचा अष्टपैलू ‘पाहुणा’ ललित यादव पहिल्या सामन्यात संघाचा उपकर्णधार आहे. अर्जुन तेंडुलकर गोव्यातर्फे यंदा सलग चौथा रणजी करंडक स्पर्धा मोसम खेळेल. डावखुरा फिरकी गोलंदाज विकास सिंग यालाही संघात जागा मिळाली. यष्टिरक्षक राजशेखर हरिकांत याने संघात पुनरागमन केले.

गतमोसमात रणजी संघ निवडीत डावलण्यात आलेला मूळ दिल्लीचा, पण मागील चार वर्षे गोव्यात स्थानिक क्रिकेट, तसेच राज्याकडून बीसीसीआय वयोगट स्पर्धेत खेळलेला अभिनव तेजराणा यावेळी संघातील नवा चेहरा आहे. अभिनव याने कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील स्पर्धेत २०२३-२४ मोसमातील सहा सामन्यांत ४७.५८च्या सरासरीने ५७१ धावा केल्या होत्या, पण २०२४-२५ मध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष झाले.

या मोसमाच्या सुरवातीस अभिनवने कर्नाटकातील स्पर्धेतील चार सामन्यांत ३२९ धावा करून चुणूक दाखविली होती. २०२५ मधील जीसीएच्या गोवा प्रीमियर लीग स्पर्धेत त्याने पाच सामन्यात ३०० धावा केल्या होत्या.

गोव्याचा संघ

दीपराज गावकर (कर्णधार), ललित यादव (उपकर्णधार), सुयश प्रभुदेसाई, मंथन खुटकर, दर्शन मिसाळ, मोहित रेडकर, समर दुभाषी, हेरंब परब, विकास सिंग, विजेश प्रभुदेसाई, ईशान गडेकर, कश्यप बखले, राजशेखर हरिकांत, अर्जुन तेंडुलकर, अभिनव तेजराणा. मुख्य प्रशिक्षक ः मिलाप मेवाडा, साहाय्यक प्रशिक्षक ः दोड्डा गणेश.

माजी कर्णधार दर्शनची कामगिरी

मोसम सामने विजय पराभव अनिर्णित

२०१७-१८ २ ० १ १

२०२२-२३ ७ २ २ ३

२०२३-२४ ७ ० ५ २

२०२४-२५ ६ ६ ० ०

एकूण २२ ८ ८ ६

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: गत निवडणुकीपासून प्रतिक्षित, प्रमुख सरकारी महामंडळांवर अचानक नियुक्त्या का?

Goa Today's News Live: म्हावळींगे खून प्रकरण; 'मास्टरमाईंड'ला डिचोली पोलिसांकडून अटक

डायपरमुळे लहान मुलांच्या किडनीला धोका? व्हायरल व्हिडिओतील दावा डॉक्टरांनी काढला खोडून, वाचा काय म्हणाले

Tripurari Poornima: विठ्ठलापुरात वाळवंटी काठी रंगणार 'त्रिपुरारी उत्सव'! कृष्ण मिरवणूक, त्रिपुरासुर वध, नौकानयन सोहळ्याचे आकर्षण

IFFI 2025: रेड कार्पेट सजतोय! राजधानीत 'इफ्फी'ची लगबग; परिसरात उत्सवी वातावरण

SCROLL FOR NEXT