GCA One Day Trophy Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

GCA One Day Trophy: 'चौगुले'च्या शिवेंद्रचे 'मॅचविनिंग' दीडशतक, 'धेंपो'च्या अभिनवची शतकी खेळी व्यर्थ, साळगावकरचीही आगेकूच

Goa Cricket News: चौगुले स्पोर्टस क्लबनं जीसीए एकदिवसीय करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

Sameer Amunekar

पणजी: यष्टिरक्षक-फलंदाज शिवेंद्र भुजबळ याने जबदरस्त फटकेबाजी करताना अवघ्या १०० चेंडूंत नाबाद १५४ धावा केल्या, त्यामुळे चौगुले स्पोर्टस क्लबला जीसीए एकदिवसीय करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणे शक्य झाले.

पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर रविवारी झालेल्या लढतीत चौगुले क्लबने विजय अत्यावश्यक लढतीत धेंपो क्रिकेट क्लबला सात विकेट्स राखून नमविले. यामुळे धेंपो क्लबच्या अभिनव तेजराणा याची तुफानी नाबाद १६० धावांची खेळी झाकोळली गेली.

२८४ धावांचा पाठलाग करताना शिवेंद्रने मधूर यादव (८१) याच्यासमवेत तिसऱ्या विकेटसाठी केलेली १९२ धावांची भागीदारी निर्णायक ठरली. गट एकमध्ये जीनो क्लबचे चार गुण झाले, तर चौगुले क्लबचे दोन गुण झाले. दोन्ही सामने गमावल्यामुळे धेंपो क्लबचे आव्हान संपुष्टात आले.

कोटार्ली-सांगे येथे साळगावकर क्रिकेट क्लबने पणजी जिमखान्याला पाच धावांनी हरविले. पणजी जिमखान्याच्या दिशांक मिस्कीन (६०) व मोहित रेडकर (८७) यांनी सहाव्या विकेटसाठी १४५ धावांची भागीदारी केली, पण २० धावांत अखेरच्या पाच विकेट गमावल्यामुळे त्यांना सलग दुसऱ्या पराभवास सामोरे जावे लागले. साळगावकर क्लबने सलग दुसऱ्या विजयासह (४ गुण) उपांत्य फेरी गाठली. दोन गुण असलेल्या मडगाव क्रिकेट क्लबनेही पुढील फेरीत प्रवेश केला.

संक्षिप्त धावफलक

धेंपो क्लब ः ४० षटकांत ८ बाद २८३ (अभिनव तेजराणा नाबाद १६० - ११२ चेंडू, १२ चौकार, ११ षटकार, स्नेहल कवठणकर ३०, जीवन चित्तेम २६, फेलिक्स आलेमाव ४-५१) पराभूत वि. चौगुले क्लब ः ३१.२ षटकांत ३ बाद २८८ (सनथ नेवगी २७, शिवेंद्र भुजबळ नाबाद १५४ - १०० चेंडू, ११ चौकार, १२ षटकार, मधूर यादव ८१ - ५५ चेंडू, ८ चौकार, २ षटकार, समीत आर्यन मिश्रा २-६४).

साळगावकर क्लब ः ४० षटकांत ६ बाद २५८ (पियुष यादव ७६ - ८६ चेंडू, ७ चौकार, २ षटकार, शंतनू नेवगी २६, यश कसवणकर नाबाद ७२ - ६४ चेंडू, ७ चौकार, १ षटकार, तुनीष सावकार २७, मोहित रेडकर २-२३) वि. वि. पणजी जिमखाना ः २९ षटकांत सर्वबाद २५३ (सुयश प्रभुदेसाई ४०, दिशांक मिस्कीन ६० - ५४ चेंडू, ३ चौकार, २ षटकार, मोहित रेडकर ८७ - ५१ चेंडू, ७ चौकार, ५ षटकार, ऋत्विक नाईक ४-७९).

अशा होतील उपांत्य लढती

२९ एप्रिल २०२६

पर्वरी येथे जीनो स्पोर्टस क्लब विरुद्ध मडगाव क्रिकेट क्लब

सांगे येथे चौगुले स्पोर्टस क्लब विरुद्ध साळगावकर क्रिकेट क्लब

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Heatwave: उकाड्याने नागरिक हैराण; जलस्रोतांवर वाढली वर्दळ, 'धोंड तळी' बनली आकर्षणाचे केंद्र

Goa Politics: मुरगावात भाजपचे शिलेदार भक्‍कम स्‍थितीत, काँग्रेस पक्षासह विरोधक थंडच; माविन गुदिन्‍होंचे स्‍थान मजबूत

Viral Video: हॉटेलच्या किचनमध्ये 'पाहुणी' आली! 12 फुटी महाकाय मगर थेट ओट्यावर स्वार, कर्मचाऱ्यांची उडाली तारांबळ; अंगावर काटा आणणारा थरार व्हायरल

राजकारणाला कलाटणी देणाऱ्या निवडणुका

"ग्रहांच्या राजाची मेहरबानी!" 'या' राशींसाठी सूर्यदेव रिअल हिरो; कष्टाला मिळणार भाग्याची जोड अन् बँक बॅलन्समध्ये होणार मोठी वाढ

SCROLL FOR NEXT