Sahil Tavora | FC Goa Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

FC Goa: गोमंतकीय मध्यरक्षक साहिल ताव्होरा पुन्हा एफसी गोवात; आठ वर्षांनंतर ‘घरवापसी’

Sahil Tavora: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एफसी गोवाने साहिलशी करार केला

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबाद एफसीतर्फे आयएसएल करंडक जिंकलेला २८ वर्षीय गोमंतकीय मध्यरक्षक साहिल ताव्होरा पुन्हा एफसी गोवा संघात परतला आहे.

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एफसी गोवाने मध्यरक्षकाशी करार केला. यापूर्वी साहिल एफसी गोवातर्फे २०१६ मधील आयएसएल स्पर्धेत खेळला होता. तेव्हा सहा सामन्यांत दोन गोल नोंदविले होते. चेन्नईयीन एफसीविरुद्ध त्या मोसमातील फातोर्डा येथे त्याने विजयी गोल केला होता.

एफसी गोवा संघात परतण्याविषयी साहिल म्हणाला, की ‘‘आठ वर्षांनंतर पुन्हा एफसी गोवात दाखल होताना मी उत्साहित आहे. माझ्यासाठी ही खऱ्या अर्थाने घरवापसी आहे. संघासाठी लक्ष्य साध्य करताना मी पूर्ण झोकून प्रयत्न करेन. टप्प्याटप्प्याने प्रगतीवर मी विश्वास ठेवतो. एफसी गोवाकडे पुन्हा येण्याचे प्रशिक्षक मानोलो हे सुद्धा एक कारण आहे. सध्या भारतीय फुटबॉलमधील ते एक सर्वोत्तम मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली फुटबॉलपटू या नात्याने प्रगती कायम राखण्यास इच्छुक आहे.’’

‘आयएसएल’मध्ये विजयी योगदान

मार्केझ प्रशिक्षक असताना हैदराबाद एफसीने २०२१-२२ मध्ये आयएसएल करंडक जिंकला होता. तेव्हा केरळा ब्लास्टर्सविरुद्धच्या अंतिम लढतीत साहिलने महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्याने बरोबरीचा गोल नोंदविल्यामुळे सामन्याचा निकाल पेनल्टी फटक्यांवर लागला व त्यात हैदराबादने बाजी मारली. ब्राझील फुटेबॉल अकादेमिया व गोव्यातील सेझा फुटबॉल अकादमीचा प्रशिक्षणार्थी असलेल्या साहिलने २०१३ साली धेंपो स्पोर्टस क्लबतर्फे व्यावसायिक फुटबॉल कारकिर्दीस सुरवात केली. आयएसएलमध्ये तो हैदराबादव्यतिरिक्त मुंबई सिटी एफसीतर्फेही खेळला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT