Goa Cricket News Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Ranji Trophy 2025: गोव्याला फॉलोऑनचा धोका! 2 शतकांसह सौराष्ट्रचा धावपर्वत, अर्जुन तेंडुलकरसह गोलंदाज हतबल

Goa Vs Saurashtra: राजकोट येथे सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर सोमवारी गोव्याने पहिल्या डावात २ बाद १२५ धावा केल्या होत्या, ते अजून ४६० धावांनी मागे असून फॉलोऑनचा धोका आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: प्रेरक मांकड, सम्मर यांची दणकेबाज शतके, तसचे पहिलाच सामना खेळणारा हेत्विक कोटक याच्या अर्धशतकाच्या बळावर सौराष्ट्राने रणजी करंडक क्रिकेट सामन्यात गोव्याविरुद्ध धावपर्वत रचला. पाहुण्या संघाचे गोलंदाज यजमानांच्या निर्धारपूर्वक फलंदाजीसमोर हतबल ठरले.

राजकोट येथे सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर सोमवारी गोव्याने पहिल्या डावात २ बाद १२५ धावा केल्या होत्या, ते अजून ४६० धावांनी मागे असून फॉलोऑनचा धोका आहे. सौराष्ट्राने कालच्या ४ बाद ३१७ धावांवरून पहिला डाव ७ बाद ५८५ धावांवर घोषित केला.

त्यांची गोव्याविरुद्ध रणजी करंडक स्पर्धेतील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. ३१ वर्षीय प्रेरक मांकड (१५५) याचे चौथे, तर २२ वर्षीय डावखुरा सम्मर गज्जर (११६) याने पहिल्याच शतकाची नोंद केली.

पदार्पण करणारा हेत्विक कोटक (५०) याने नाबाद अर्धशतक केले. गोव्यातर्फे डावखुरा फिरकी गोलंदाज दर्शन मिसाळ याने चार गडी बाद करताना १९५ धावा मोजल्या. डावखुरा वेगवान अर्जुन तेंडुलकर याला फक्त एका विकेटसाठी तब्बल १४५ धावा द्याव्या लागल्या

गोव्याला पहिल्याच षटकात धक्का बसला. सुयश प्रभुदेसाईला शून्यावर वेगवान जयदेव उनाडकट याने पायचीत केले. नंतर मंथन खुटकर (१८) व अभिनव तेजराणा (नाबाद ७५) या डावखुऱ्या फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली.

युवराजसिंग डोडिया याच्या गोलंदाजीवर मंथनने यष्टिरक्षक हार्विक देसाईकडे झेल दिला. नंतर स्नायूदुखीमुळे स्नेहल कवठणकर (४) जखमी निवृत्त होऊन मागे फिरला. दिवसअखेर ललित यादव २३ धावा करून अभिनवला साथ देत होता. गोव्याची मदार या जोडीवरच जास्त आहे. शानदार फॉर्म कायम राखताना अभिनवने ८८ चेंडूंतील आक्रमक खेळीत नऊ चौकार व दोन षटकार लगावले.

पहिल्या दिवसअखेर रविवारी ८८ धावांवर नाबाद असलेल्या प्रेरक याने सोमवारी सकाळी ६७व्या प्रथम श्रेणी सामन्यातील चौथ्या शतकाची नोंद केली. त्यानंतर त्यानंतर दीडशतकी मजलही सहजपणे मारली.

दर्शन याने कर्णधार स्नेहल कवठणकर याच्याकरवी प्रेरकला झेलबाद केले. त्याने १८१ चेंडूंत १८ चौकार व चार षटकारांसह दीडशतकी खेळी केली. प्रेरकने सम्मर याच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी १७९ धावांची भागीदारी केली. नंतर हेत्विक याने सम्मरला चांगली साथ दिली. या जोडीने सहाव्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली.

दर्शनच्या गोलंदाजीवर सम्मर याने सुयश प्रभुदेसाईच्या हाती झेल दिला. त्याने १६८ चेंडूंचा सामना करताना १४ चौकार व एका षटकार मारला.. पहिलाच रणजी डाव खेळणारा हेत्विक याने ११९ चेंडूंतील खेळीत सहा चौकार मारले.

संक्षिप्त धावफलक

सौराष्ट्र, पहिला डाव (४ बाद ३१७ वरुन) ः १५० षटकांत ७ बाद ५८५ घोषित (प्रेरक मांकड १५५, सम्मर गज्जर ११६, हेत्विक कोटक नाबाद ५०, पार्थ भूत २६, अर्जुन तेंडुलकर २९-२-१४५-१, वासुकी कौशिक २७-१२-४७-१, दीपराज गावकर ३-०-२९-०, दर्शन मिसाळ ४६-२-१९५-४, मोहित रेडकर २२-१-८७-१, ललित यादव २२-३-७४-०, अभिनव तेजराणा १-०-५-०).

गोवा, पहिला डाव ः ३० षटकांत २ बाद १२५ (सुयश प्रभुदेसाई ०, मंथन खुटकर १८, अभिनव तेजराणा ७५, स्नेहल कवठणकर जखमी निवृत्त ४, ललित यादव नाबाद २३, जयदेव उनाडकट १-२६, युवराजसिंग डोडिया १-३२).

सौराष्ट्रातर्फे गोव्याविरुद्ध शतके

फलंदाज धावा स्थळ मोसम

सितांशू कोटक ११८ मडगाव २००३-०४

चेतेश्वर पुजारा १४५ राजकोट २००५-०६

चिराग जानी १४० अहमदाबाद २०२१-२२

प्रेरक मांकड १५५ राजकोट २०२५-२६

सम्मर गज्जर ११६ राजकोट २०२५-२६

संकलन ः किशोर पेटकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election: पैंगीणमध्‍ये तिरंगी लढतीची शक्‍यता! राजकीय समीकरणे बदलू लागली; प्रचारात गोवा फॉरवर्डची आगेकूच

Porvorim: सर्वत्र धूळच धूळ! पर्वरी महामार्गावरील वाढती समस्या; वाहनचालकांसाठी प्रवास त्रासदायक

Tivrem Vargao: 2 गटांत रंगली चुरस! तिवरे–वरगावात सत्तासंघर्षाचा विस्फोट; सरपंच–उपसरपंचांवरील अविश्वास ठराव मंजूर

Horoscope: प्रॉपर्टी होणार नावावर, कामासाठी होणार प्रवास; 'या' राशींसाठी आजचा दिवस खास

IFFI 2025: 'इफ्फी' परेडमुळे पणजीत अर्धा दिवस सुट्टी! सरकारी कार्यालये आणि स्वायत्त संस्था दुपारनंतर बंद

SCROLL FOR NEXT