पणजी: महाराष्ट्राच्या जलज व हितेश याच्या फिरकी मान्ऱ्यासमोर गोव्याचे इतर फलंदाज अपयशी ठरले असता, शनिवारी शतकवीर अभिनव रोजराणा (१०९) पाने अनुभवी दर्शन मिसाळ (नाबाद ५२) याच्यासह जबरदस्त झुंज दिली. यामुळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट व गट सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर ६९ धावांनी नाममात्र आघाडी घेता आली.
गहुंजे-पुणे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राने पहिल्या डावात ३५० धावा केल्यानंतर गोव्याने दिवसअखेर ६ बाद २१० धावा केल्या. अभिनव व दर्शन या डावखुऱ्या फलंदाजांनी गोव्याला ४ बाद ७० वरून सावरले. या जोडीने महाराष्ट्राच्या गोलंदाजांना सतावताना पाचव्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी केली, त्यामुळे सलग तिसऱ्या पराभवाच्या खाईत असलेल्या गोव्याला चौथ्या दिवसपर्यंत जीवदान मिळाले.
शनिवारी सकाळी महाराष्ट्राचा २६ वर्षीय यष्टिरक्षक फलंदाज सौरभ नवले याने कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. त्यामुळे महाराष्ट्राला १४१ धावांची मोठी आघाडी मिळाली. नवले याने १७३ चेंडूत १५ चौकारांच्या मदतीने १०५ धावा केल्या, दहाव्या क्रमांकावरील विकी ओस्तवाल ३८ धावांवर बाद राहिला. गोव्याचा ऑफस्पिनर ललित यादव प्रभावी उरला. त्याने चौघांना बाद केले.
गोवा, पहिला डाव २०९ महाराष्ट्र, पहिला डाव (८ बाद ३०६ वहन) १०६ षटकांत सर्वबाद ३५० (सौरभ नवले १०५, विकी ओस्तवाल नाबाद ३८, बासुकी कौशिक २३-५-५८-२, अर्जुन तेंडुलकर १२-२०४९-२, दर्शन मिसाळ २४-१-६८-१, अमूल्य पट्टिकर १७-२-५७-१, ललित यादव २०-२-९८-४, दीपराव गावकर ३-१-१०).
गोवा, दुसरा डाव ७३ पटकांत ६ बाद २१० (सुयश प्रभुदेसाई १३. मंथन खुटकर १८, अभिनव रोजराणा १०९, स्नेहल कवठणकर १. ललिव सादव ०, दर्शन मिसाळ नाबाद ५२. दीपराज गावकर ४, अर्जुन तेडुलकर नाबाद ०, जलज सक्सेना ३००५० ६४-२, रामकृष्ण घोष ८-१-३६००, विकी ओस्तवाल १७-१-५२-१, हितेश वाळुंज १८-४-४५-३).
डावखुरा २५ वर्षीय फलंदाज अभिनव तेजराणा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पदार्पणातील मोसमात गोव्यासाठी 'धावमशीन' ठरले आहे.
त्याने २०२५-२६ मधील ६ सामन्यांतील १० डावांत एकवेळ नाबाद राहत ८५.५५च्या सरासरीने ७७० धावा केल्या आहेत. यामध्ये ४ शतके व २ अर्धशतकांचा समावेश आहे. सध्या त्याने रणजी करंडक स्पर्धेत यंदा सर्वाधिक धावा नोंदविल्या आहेत. चंडीगडविरुद्ध पर्वरी येथे त्याने पदार्पणात द्विशतक (२०५) करण्याचा पराक्रम साधला होता. त्यानंतर पंजाबविरुद्ध न्यू चंडीगड येथे १३१, सौराष्ट्रविरुद्ध राजकोट येथे ११८, तर आता पुण्यात महाराष्ट्राविरुद्ध १०९ धावा केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.