Purvi Naik Goa Swimming Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Purvi Naik: पूर्वी नाईकची ‘गोल्डन’ चमक! 200 मीटर फ्रीस्टाईलमध्ये अव्वल कामगिरी

Goa Swimming: पूर्वी नाईक हिने लाजवाब जलतरण साधताना प्राथमिक फेरीतील आपली कामगिरी कमालीची सुधारत ४१व्या राष्ट्रीय सबज्युनियर जलतरण स्पर्धेत गोव्यासाठी सोमवारी सुवर्णपदक जिंकले.

Sameer Panditrao

पणजी: पूर्वी नाईक हिने लाजवाब जलतरण साधताना प्राथमिक फेरीतील आपली कामगिरी कमालीची सुधारत ४१व्या राष्ट्रीय सबज्युनियर जलतरण स्पर्धेत गोव्यासाठी सोमवारी सुवर्णपदक जिंकले. मुलींच्या गट तीनमधील २०० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत तिने अव्वल क्रमांक प्राप्त केला. तिने २ मिनिटे १८.३५ सेकंद वेळ नोंदविली. स्पर्धा बंगळूर येथे सुरू आहे.

पूर्वीने सकाळच्या सत्रातील पात्रता फेरीत २ मिनिटे २४.८४ सेकंद वेळ नोंदविली होती. अंतिम फेरीत तिने कमालीचा वेग साधताना कर्नाटकच्या जलतरणपटूंना खूपच मागे टाकले. रौप्यपदक विजेत्या स्तुती सिंग हिने २ मिनिटे २०.३० सेकंद वेळेत दुसरा क्रमांक मिळविला. ब्राँझपदक विजेत्या नायरा बोपण्णा हिने २ मिनिटे २०.४३ सेकंद वेळेची नोंद केली.

हरवळे-साखळी येथील पूर्वी ही म्हापसा येथील खेलो इंडिया राज्य उत्कृष्टता केंद्रातील जलतरण प्रशिक्षणार्थी आहे. तिला या केंद्राचे जलतरण प्रशिक्षक टी. ए. सुजीत यांचे मार्गदर्शन लाभते.

पूर्वी हिने गतवर्षी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत एकूण चार पदके जिंकली होती. यामध्ये ५० मीटर फ्रीस्टाईलमध्ये सुवर्ण, १०० मीटर फ्रीस्टाईल व ४०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये रौप्य, तर २०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये ब्राँझपदक जिंकले होते. यावेळच्या स्पर्धेत ती बाकी शर्यतीत भाग घेणार असल्याने तिच्या गळ्यात आणखी पदके दिसू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT