Professional Football League | Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Professional League: प्रोफेशनल लीगमध्ये धेंपो क्लब, एफसी गोवाचे विजय; जीनो, चर्चिलचे पराभव

Professional Football League: गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत धेंपो स्पोर्टस क्लबने चर्चिल ब्रदर्सवर २-१ फरकाने मात केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Professional League FC Goa Dempo Club Win

पणजी: गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत धेंपो स्पोर्टस क्लबने चर्चिल ब्रदर्सवर २-१ फरकाने मात केली. सामना शनिवारी एला-जुने गोवे येथील धेंपो अकादमी मैदानावर झाला. म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर एफसी गोवाने जीनो एफसीला हरवले.

धेंपो क्लबसाठी मेवन डायस याने अनुक्रमे आठव्या व ३८व्या मिनिटास नोंदविले. चर्चिल ब्रदर्सची पिछाडी हाओकिप याने ९०+२व्या मिनिटास कमी केली. धेंपो क्लबचा हा नऊ सामन्यांतील सातवा विजय असून २१ गुणांसह त्यांनी दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. चर्चिल ब्रदर्सला सातवा पराभव पत्करावा लागला. नऊ लढतीनंतर सहा गुण कायम राहिले.

एफसी गोवाच्या जोव्हियल डायस याने दोन (१३ व ६१वे मिनिट), शेख ईस्माईल याने ४९व्या मिनिटास एक गोल केला. एफसी गोवाचा हा नऊ सामन्यांतील चौथा विजय असून त्यांचे १२ गुण झाले आहेत. जीनो एफसीचे दुसऱ्या पराभवामुळे नऊ लढतीनंतर त्यांचे १९ गुण कायम राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT