football 2.jpg Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Professional League 2024: पोलिस संघाचा दहा खेळाडूंसह ‘साळगावकर’ला धक्का; एफसी गोवाची चर्चिल ब्रदर्सवर मात

Professional Football League 2024: पोलिस संघाला दहा खेळाडूंसह खेळावे लागले, तरीही नाऊमेद न होता त्यांनी प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत क्लब द साळगावकरला २-० फरकाने धक्का दिला. एफसी गोवा संघाने चर्चिल ब्रदर्सला ४-३ फरकाने निसटते हरविले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Professional Football League 2024

पणजी: सामन्याच्या पूर्वार्धात खेळाडूस रेड कार्ड मिळाल्यानंतर सुमारे तासभर गोवा पोलिस संघाला दहा खेळाडूंसह खेळावे लागले, तरीही नाऊमेद न होता त्यांनी प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत क्लब द साळगावकरला २-० फरकाने धक्का दिला. म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर रविवारी सामना झाला.

क्लब द साळगावकरचा हा स्पर्धेतील पहिलाच पराभव ठरला. गोवा पोलिस संघाच्या साईश कुंकळकर याला ३१व्या मिनिटास रेड कार्ड मिळाले, त्यामुळे सामन्यातील बाकी ५९ मिनिटे त्यांना दहा खेळाडूंसह खेळावे लागले.

त्यापूर्वी १६व्या मिनिटास रोनाल्डो ऑलिव्हेरा याच्या गोलमुळे गोवा पोलिस संघाने आघाडी प्राप्त केली होती. नंतर ६५व्या मिनिटास बदली खेळाडू सॅम्युएल डिसोझा याने केलेल्या गोलमुळे गोवा पोलिसांचा स्पर्धेतील पाचवा विजय नक्की झाला. त्यांचे आता सहा लढतीतून सर्वाधिक १५ गुण झाले असून स्पर्धेत अग्रस्थान मिळविले आहे. पहिल्या पराभवानंतर क्लब द साळगावकरचे सहा सामन्यांनंतर ११ गुण कायम राहिले.

एफसी गोवाची चर्चिल ब्रदर्सवर मात

बाणावली येथे रविवारी झालेल्या प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात एफसी गोवा संघाने चर्चिल ब्रदर्सला ४-३ फरकाने निसटते हरविले. एफसी गोवासाठी लाल्थांगलियाना याने पहिल्या, जोव्हियल डायस याने अनुक्रमे सहाव्या व १८व्या, तर ब्रायसन परेराने ३७व्या मिनिटास गोल केला. चर्चिल ब्रदर्सने चार गोलच्या पिछाडीवरून मुसंडी मारली. त्यांच्यासाठी अश्वेक जाधव याने ४४व्या, बदली खेळाडू लुनमिन्लेन हाओकिप याने ५१व्या, तर ट्रिजॉय डायसने ७८व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. स्पर्धेतील तिसऱ्या विजयामुळे एफसी गोवाचे आता सहा लढतीतून नऊ गुण झाले आहेत, तर चर्चिल ब्रदर्सचे सहा सामन्यांनंतर तीन गुण कायम राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT