Goa Football Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Professional League 2024: एका गोलच्या पिछाडीनंतर FC Goaची मुसंडी; गार्डियन एंजलवर ३-१ फरकाने शानदार विजय

Professional Football League 2024: सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटास मॅक्सन लोपिस याने गार्डियन एंजल क्लबला आघाडी मिळवून दिली. ३७व्या मिनिटास प्रतिस्पर्धी खेळाडू लिव्हन क्लेमेंत याच्या स्वयंगोलमुळे एफसी गोवाने बरोबरी साधली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी एफसी गोवाने एका गोलच्या पिछाडीवरून गार्डियन एंजल स्पोर्टस क्लबवर ३-१ फरकाने शानदार विजय प्राप्त केला. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटास मॅक्सन लोपिस याने गार्डियन एंजल क्लबला आघाडी मिळवून दिली. ३७व्या मिनिटास प्रतिस्पर्धी खेळाडू लिव्हन क्लेमेंत याच्या स्वयंगोलमुळे एफसी गोवाने बरोबरी साधली. एफसी गोवाच्या विजयात जोव्हियल डायस याने ७२व्या मिनिटास, तर लाल्थांगलियाना याने ८५व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला.

गोवा पोलिस संघाने जीएफए प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत विजयी हॅटट्रिक साधताना कळंगुट असोसिएशनला २-१ फरकाने नमविले. सामन्याच्या ८१व्या मिनिटास बदली खेळाडू सॅम्युएल डिसोझा याने नोंदविलेल्या गोलमुळे गोवा पोलिस संघाला स्पर्धेत सलग तिसरा सामना जिंकता आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

SCROLL FOR NEXT