Goa Cricket Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Cricket: गोव्याचा यष्टिरक्षकाचा प्रश्न सुटणार? शिवेंद्र भुजबळच्या फलंदाजीने दिला मोठा दिलासा

Dinesh Mongia Goa Coach: ओमानचा क्रिकेट दौरा गोव्याचे मुख्य प्रशिक्षक दिनेश मोंगिया यांच्यासाठी आगामी मोसमापूर्वी खेळाडूंची चाचपणी करण्याच्या दृष्टीने फलदायी ठरल्याचे मानले जाते.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: ओमानचा क्रिकेट दौरा गोव्याचे मुख्य प्रशिक्षक दिनेश मोंगिया यांच्यासाठी आगामी मोसमापूर्वी खेळाडूंची चाचपणी करण्याच्या दृष्टीने फलदायी ठरल्याचे मानले जाते. त्यापैकी यष्टिरक्षक-फलंदाज शिवेंद्र भुजबळ याची आश्वासक फलंदाजी रणजी करंडक स्पर्धेपूर्वी दिलासा देणारी असून संघाला सतावरणारा प्रश्न सुटण्याचे संकेत आहेत.

शिवेंद्रने ओमानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय (सराव) मालिकेत दोन वेळा नाबाद राहत २५२ धावा केल्या. अखेरच्या दोन लढतीत विजय नोंदवून गोव्याच्या संघाने मालिका २-१ अशी जिंकली. त्यात २३ वर्षीय शिवेंद्रने दुसऱ्या लढतीत नाबाद ९०, तर तिसऱ्या लढतीत नाबाद १४३ धावांची खेळी केली. साहजिकच ११ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी स्पर्धेसाठी संघाचा प्रमुख यष्टिरक्षक या नात्याने शिवेंद्रचा विचार होऊ शकतो.

फक्त तो चार दिवसीय सामन्यांतही एकदिवसीय लढतीप्रमाणे आक्रमकता आणि संयम यांचा सुरेख संगम साधत यष्टिमागे चोख भूमिका निभावणार का हे पाहावे लागेल. वयोगट पातळीवर गोव्याचे प्रतिनिधित्व करताना शिवेंद्रने मोठी खेळी करण्याची क्षमता यापूर्वी सिद्ध केलेली आहे.

गतमोसमात दोन यष्टिरक्षक

गोव्याच्या रणजी क्रिकेट संघातून गतमोसमात दोन यष्टिरक्षक खेळले. मध्य प्रदेशविरुद्ध चौथ्या लढतीत यष्टिरक्षक समर दुभाषीला दुखापत झाल्यानंतर राजशेखर हरिकांत याने बदली या नात्याने हातात ग्लोव्हज चढविले. संघाच्या दुसऱ्या डावात त्याने आक्रमक शैलीत ४० धावा केल्यानंतर तो आणखी दोन सामने खेळला. राजशेखर महाराष्ट्राविरुद्ध दोन्ही डावांत शून्यावर बाद झाल्यानंतर समरने केरळविरुद्ध पुनरागमन केले.

गतमोसमातील रणजी करंडक स्पर्धेत समरने ५ सामन्यांत २१.७५च्या सरासरीने ८७ धावा, तर राजशेखरने ३ सामन्यांत २४.६०च्या सरासरीने १२३ धावा केल्या. राजशेखर ३५ वर्षीय, तर समर ३० वर्षीय आहे. त्यामुळे गोवा क्रिकेट असोसिएशनची सीनियर निवड समिती आता युवा यष्टिरक्षकाच्या शोधात निश्चितच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Griha Aadhar Scheme: 'गृहआधार'च्या रकमेत वाढ; दिवाळीत CM सावंत करणार मोठी घोषणा

RGP Membership: फक्त 5 रुपयांत 'आरजी'चे सदस्यत्व; वीरेश बोरकरांकडून निधी संकलनाची मोहीम सुरू

Shani Vakri Upay 2026: वक्री शनि वाढवणार 'या' 5 राशींच्या जातकांची डोकेदुखी, नशिबात मोठा संघर्ष; ताबडतोब करा हे उपाय

Iran Torlls UN: शोलेच्या ‘ठाकूर’सारखी युएनची अवस्था! इराणच्या नव्या मीम डिप्लोमेसीनं उडवली खळबळ; सोशल मीडियावर जोरदार चर्चा

AI Human Control: 'एआय'वर हवा मानवी लगाम; तंत्रज्ञानाच्या वेगापेक्षा जागतिक नियंत्रणाची गरज

SCROLL FOR NEXT